Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पुरावेच गायब झाले का? बचाव पक्षाचा खळबळजनक दावा
Sarkarnama April 08, 2026 12:45 AM

Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण हत्या प्रकरणाची मंगळवारची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होईल. अभियोग पक्षाने बचाव पक्षाला दिलेल्या डिजीटल पुराव्यांचा पेनड्राईव्हमधील डेटा आणि लॅपटॉपमधील डेटा एकच असल्याचे पत्र बचाव पक्षानं मागितलं आहे.

Ashok Kharat: खरात प्रकरणात SITच्या तपासात काय काय निष्पण्ण झालं? तपास प्रमुखांनी दिली ए-टू झेड माहिती

9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे टाकळी फाटा (ता. केज) जवळून अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. खून प्रकरणासह अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली याच कंपनीच्या मस्साजोग प्रकल्पावरील भांडण व तेथील सुरक्षा रक्षकाला जातीवाचक शिवीगाळ या तीनही प्रकरणांचा एकत्रित तपास गुन्हे अन्वेषण विभागाने केला.

Maharashtra IAS News: मोठी बातमी: फडणवीस सरकारचा आठ दिवसांतच प्रशासनाला दुसरा धक्का; 'या' 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

यात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, सुधीर सांगळे व फरार आरोपी कृष्णा आंधळे यांच्यावर कट करुन खून, खंडणी, जातीवाचक शिवीगाळ केल्याचे आरोप निश्चित केला. या प्रकरणांची एकत्रित सुनावणी येथील विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पाटवकदर यांच्या न्यायालयात सुरु आहे. मंगळवारच्या सुनावणीत बचाव पक्षाचे वकील अॅड. मुंडे व अॅड. शेप यांनी पेनडाईव्हमध्ये काही फाईल नसल्याचे सांगीतले. त्यानंतर सीआयडीचे उपाधीक्षक गुजर यांनी बचाव पक्षाच्या वकिलांना संगणक कक्षात नेऊन दोन्हींकडील फाईलची पडताळणी करुन दाखवली. त्यानंतर ही सुनावणी 24 ला घेण्याचे आदेश देण्यात आले.

Maharashtra farmers : पिकांची नासाडी, खरेदी केंद्रावर बारदाना नाही; व्यापार्यांकडून शेतकर्यांची पिळवणूक; आमदार अमित देशमुख संतापले!

या आधीच्या सुनावणीमध्ये आरोपींच्या वकीलांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना खटल्यातून हटवण्याची मागणी करणारा दाखल अर्ज कोर्टाने फेटाळला होता. बचाव पक्षाकडून सातत्याने खटला लांबवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप फिर्यादी पक्ष आणि सरकारी वकीलांकडूनही करण्यात आला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.