Maharashtra IAS officers transfer list April 2026 : महाराष्ट्रातील प्रशासनात बदल्याच्यांचे वारे वाहत असल्याचे चित्र आहे. कारण, आठवडाभरात राज्यात ३५ पेक्षा जास्त सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये अनेक महत्त्वाच्या आयएएस अधिकार्यांच्या नावाचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात राज्यात २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यात तुकाराम मुंडे यांच्या नावाचाही समावेश होता. आज आणखी ११ सनदी अधिकार्यांची बदली झाली आहे.
आज ११ सनदी अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या विभागात बदली झाली आहे. त्यामध्ये आयएएस अधिकारी श्वेता सिंघल, रंजन महिवाल, लक्ष्मण राऊत या अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. २ एप्रिलला सरकारकडून २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा आज ११ अधिकाऱ्यांच्या बदलीचे ऑर्डर काढण्यात आले आहेत. आज कुणाची बदली कुठे झाली? याबाबत जाणून घेऊयात..
पुण्यातील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रंजन महिवाल यांची बदली आता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी रूचेश जयवंशी यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची बदली आता मुंबईतील 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या' (POCRA) प्रकल्प संचालकपदी करण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana : मे महिन्यापासून 'या' लाडक्या बहिणींचा लाभ बंद, तुमचं नाव तर नाही ना?नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची बदली आता जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी यवतमाळमधील पांढरकवडायेथे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अमित रंजन यांची नाशिकचे नवीन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांची बदली मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिवपदी करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी लक्ष्मण राऊत यांची नियुक्ती झाली आहे. लक्ष्मण राऊत हे यापूर्वी बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव होते. आता या पदाची जबाबदारी पंकज देवरे सांभाळणार आहेत. महावितरणच्या कल्याण विभागाचे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप जगदाळे यांची बदली मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सहसचिवपदी झाली आहे. त्यांच्या जागी कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच श्वेता सिंघल यांची नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या विशेष निवासी आयुक्तपदी वर्णी लागली आहे. या बदल्यांमुळे महसूल, कृषी आणि स्थानिक प्रशासकीय विभागांत मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत.
शेतकऱ्यांना 'अवकाळी' दिलासा; १२८ कोटींची मदत; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय