कचरा वेचणाऱ्या गायकाला आयफोन गिफ्ट, कामही देणार; शिखर पहारियाचं मन मोठं, जान्हवी कपूरचंही 'लव्ह लाईक'
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 07, 2026 09:43 PM

Shikhar Pahariya helps Mukesh Mahadev: अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) बऱ्याचदा वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असते. ती आपल्या बॉयफ्रेंडचं अनेकदा कौतुक करताना दिसते. जान्हवी कपूर आणि  तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाचे (Shikhar Pahariya) फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असतात.  शिखर उद्योजक असून,  स्टाईल आयकॉन देखील आहे. शिखर पहारिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण सध्या त्याच्या चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे.  शिखर पहारियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शिखर अनाथ आणि रस्त्यावरुन कचरा वेचणाऱ्या मुकेश महादेवला आर्थिक मदत आणि पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. माहितीनुसार, मुकेश महादेवला गायनाची आवड आहे. दरम्यान,  मुकेश महादेवच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठीही शिखर प्रयत्न करणार असल्याचं  त्यानं सांगितलं. 

शिखर पहारियाकडून स्ट्रीट सिंगर मुकेश महादेवची मदत (Shikhar Pahariya Helps Mukesh Mahadev)

सध्या सोशल मीडियात स्ट्रीट सिंगर मुकेश महादेवचा गायनाचा व्हिडीओ सोशल  मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून त्याच्या टॅलेंटचं विशेष कौतुक होत आहे. परंतु, परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याला त्याच्या गायनाच्या टॅलेंटकडे फार लक्ष देता आलं नाही. तो  उदरनिर्वाहसाठी कचरा उचलण्याचं काम करत असल्याची माहिती आहे. मुकेश पाण्याच्या बाटल्या गोळा करुन विकून आपला उदरनिर्वाह करतो. अलिकडेच हुसैन मनसुरीने स्ट्रीट सिंगर मुकेश महादेवची शिखर पहारियाशी भेट घडवून दिली.  शिखर पहारिया मुकेश महादेवला भेटून खूप खुश होतो. 

यावेळी शिखर पहारिया त्याला, राहण्याची सोय आणि रोजगार देणार असल्याचं वचन देतो.  तसेच त्याला साँग अल्बममध्येही गायनाची संधी देणार असल्याचं वचन देतो.  यावेळी शिखर, 'स्वत:चे व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत का?', असा प्रश्न विचारतो. तेव्हा मुकेश, 'माझ्याकडे फोन नाही, भाऊ मला माझे व्हायरल व्हिडीओ दाखवतो', असं म्हणतो. यानंतर शिखर थेट त्याला मोबाईल फोन गिफ्ट करतो. तसेच मुकेश महादेवला टॅलेंटवर लक्ष द्यायला सांगतो. 

गर्लफ्रेंड जान्हवी कपूरकडून शिखर पहारियाचं कौतुक (Janhavai Kapoor Praises Shikhar Pahariya)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hussain Mansuri (@iamhussainmansuri)

यावेळी मुकेश महादेवने शिखर पहारियाचे मनापासून आभार मानले. तसेच शिखर पहारियासमोर गाणं सादर केलं. मुकेशचं गाणं ऐकून शिखर त्याचं कौतुक करतो. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून,  नेटकऱ्यांनीही शिखर पहारियाचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओवर शिखरची गर्लफ्रेंड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि त्याचा भाऊ वीर पहारियानं कमेंट करुन शिखरच्या कार्याचं कौतुक केलं आहे. जान्हवी कपूरने 'शिकू' आणि लाल हार्ट इमोजी कमेंट करुन बॉयफ्रेंड शिखर पहारियाचं कौतुक केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मला इन्स्टाग्रामवर बऱ्याच गे लोकांचे मेसेज येतात...'; 'बिग बॉस मराठी 6'च्या स्पर्धकाचा मोठा खुलासा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.