पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पदोन्नतीसाठी शिक्षण सेवकाकडून पावणेतीन लाखांची लाच घेणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकाऱ्यासह दोघांना रंगेहात पकडले. सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी राजेश श्रीराम खंदारे (वय ५२), कनिष्ठ सहायक अनिल पोपट रंधवे (वय ३२), आतिश कैरू शिंदे (वय ४०) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपशिक्षकपदी पदोन्नतीसाठी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती वेल्हे यांच्यामार्फत तक्रारदार यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी खंदारे यांची त्यांनी भेट घेतली. जातवैधता प्रमाणपत्र नसले, तरी अनुकूल प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवितो, असे सांगून खंदारे यांनी त्यांच्याकडे तीन लाखांची लाच मागितली.
Land Acquisition: उच्च न्यायालयाचा दणका! जमिनी मालकांना योग्य मोबदला द्या, नॅशनल हायवेज ॲथॉरिटीला आदेश, जमिनीचा मोबदला दाखवला ‘शून्य’नंतर खंदारे, रंधवे, शिंदे यांनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून २५ हजार घेतले. ‘एसीबी’कडे तक्रार दिल्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात आली. उर्वरित पावणेतीन लाख रुपये घेऊन तक्रारदाराला घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावरील एका मॉलसमोर बोलाविण्यात आले. सोमवारी सापळा लावून तक्रारदाराकडून लाच घेणाऱ्या रंधवे आणि शिंदे यांना पकडले. त्यानंतर खंदारे, रंधवे आणि शिंदे यांना ताब्यात घेतले.