परराष्ट्र सचिव अमेरिकेच्या दौऱ्यावर.
Marathi April 08, 2026 04:25 PM

नवी दिल्ली  :

पश्चिम आशिया संकटात अमेरिका अडकून पडलेला असताना भारताचे विदेश सचिव विक्रम मिसरी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. विक्रम मिसरी हे 8-10 एप्रिल या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर असणार आहेत. तर भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर हे सध्या अमेरिकेत ठाण मांडून आहेत. सर्जियो गोर यांच्या उपस्थितीत विक्रम मिसरी हे अमेरिकेच्या प्रशासनासोबत चर्चा करणार असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.