Latur News: पशुखाद्य महागल्याने दुग्ध उत्पादक त्रस्त; जळकोट; दुधाळ जनावरांना सांभाळणे झाले कठीण
esakal April 08, 2026 02:45 PM

जळकोट: तालुक्यात ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाल्याचे सध्या सर्वत्र चित्र आहे. पशुखाद्याचे दर झपाट्याने वाढले असूनही दुधाला मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे.

तालुक्यातील दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व जोडव्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. या व्यवसायावर अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. पशुगणनेनंतर हा आकडा नक्कीच वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात म्हैस आणि संकरित गायीचे प्रमाण अधिक आहे.

Ashok Kharat Son Missing : भोंदू अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; सलग दोन दिवसांच्या चौकशीनंतर मुलगा शहरातून बेपत्ता

देशी गायींची संख्या त्या तुलनेत फारच कमी आहे. देशी गायींच्या संगोपनावर अधिक भर दिल्यास, दुधाचे उत्पादन व त्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. दूध उत्पादक शेतकरी सध्या पशुखाद्याच्या वाढत्या किमतींमुळे आर्थिक अडचणीत आले आहेत.

वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला मिळणारा दर अत्यंत कमी आहे. सध्या म्हशीच्या दुधाचा दर फॅटनुसार किमान ६० रुपये प्रतिलिटर, तर गायीच्या दुधाचा दर किमान ५० रुपये प्रतिलिटर आहे. पशुखाद्याच्या वाढत्या किमतींच्या तुलनेत हे दर अगदी अपुरे असून दुग्धव्यवसाय तोट्यात जाण्याची भीती आहे.

IPL 2026, DC vs GT: गुजरातला कर्णधार गिलच्या कमबॅकची, तर दिल्लीला केएल राहुलच्या योगदानाची प्रतीक्षा; कशी असेल प्लेइंग-११

शेतकऱ्यांनी सरकारकडे दूध दरवाढ करण्याची आणि अनुदानाच्या स्वरूपात मदत मिळण्याची मागणी केली आहे. दूध दरात सुधारणा झाली नाही, तर अनेक पशुपालक शेतकऱ्यांचा हा व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. जळकोट तालुक्यातील दुग्ध व्यवसायावर मोठे संकट ओढवू शकते.

असे आहेत पशुखाद्यांचे दर

कडबा सिंगल कट्टी २५०० ते २८००

मुरघास ८००० ते १०००० प्रति टन

सरकी पेंड १२०० ते १४०० प्रति ४० किलो

शेंग पेंड १३००ते १७०० प्रति ४० किलो

मका काटा ११५० प्रति ४५ किलो

गुळी पेंड १३०० ते १६०० प्रति ५० किलो

हरभरा कळना १३०० प्रति ५०किलो

तूर कळना १०५० प्रति ५० किलो

गहू आटा १४०० प्रति ४५ किलो

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.