CHHAYA KADAM PRAISES GAURAV MORE’S INSPIRING JOURNEY: अभिनेता गौरव मोरे सध्या चर्चेत असते. नुकतच त्याने लग्न केलय तसंच त्याने स्वत:चं पवईत घर घेत स्वत:चं स्वप्न पूर्ण केलय. गौवर पवईतील फिल्टरपाड्यात लहानचा मोठा झाला. त्याने स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर घरं घेतलय. दरम्यान त्यांच्यासाठी अभिनेत्री छाया कदम यांनी एक पोस्ट शेअर केलीय. त्यांनी त्याच्या मेहनतीबद्दल तसंच किरअरच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगत त्याचं कौतूक केलय.
छाया कदम यांनी गौरव मोरेसोबत फोटो शेअर करत लिहलं की, 'स्वप्न अस्वस्थ करतात. स्वप्न लढायला, जगायला शिकवतात. अमिताभ बच्चनजींच्या जुन्या हेअर स्टाइलच्या लहानापासून फॅन असेलाला गौरव एवढ्या पुढे जात स्वप्नांचं घर उभं करु शकतो. खरंच तुझ्या मेहनतीचं कौतूक आहे.'
पुढे छाया कदम यांनी लिहलं की, 'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून आकाशात तारे पाहणारा गौरव त्याच्या मेहनतीनं आणि कामाच्या जोरावर एक दिवस स्वत: तारा उभा केलाय. जिद्द, चिकाटी आणि अमिताभजीच्या प्रेमात 'भूतनाथ' झालेला गौरव आत्मविश्वास घेऊन आपल्या कामातून दरवेळी डॉन सारखा उभा राहून वजीर सारखं चेकमेट करतो. तेव्हा तो सगळ्यांना आपलासा वाटतो. हेच 'फिल्टरपाड्याच्या बच्चन' गौरवची खासियत आहे.'
View this post on InstagramA post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)
'या सगळ्या प्रावस निखळ माणूस जराही हलत नाही. तो नव्यानं उजळतो तो ते कमालच करायला. ज्या गौरवचं बालपण झोपडपट्टीच्या जागेवर गेलं तिथेच एक उंच बिल्डिंगमध्ये त्याने घर घेतलं. त्याच्या घराचा गृहप्रवेश झाला. एका जिद्दीनं तु स्वप्नांना हिंमत दिलीस. अजून मोठा होता. इतका की एक दिवस तुझ्या यशाचा जलसा करण्याची संधी आम्हाला मिळू देत. तुला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.'
'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेची वेळ बदलली, १३ एप्रिलपासून दोन मालिकेच्या वेळेत मोठा बदल, दुसरी कोणती मालिका?