नांदेड क्राईम न्यूज : नांदेड शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत 6 आरोपींना (Crime News)बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या आरोपींनाही न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयाने त्यांना 8 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाईंड मानला जाणारा ‘साई लाला’ अद्यापही फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Nanded Crime News)
दरम्यानदोन टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून हे भीषण हत्याकांड घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी अटक केलेले 6 आरोपी हे दोन वेगवेगळ्या गँगशी संबंधित असल्याची माहिती आहे. मात्र, या रॅकेटचा मुख्य कणा असलेला साईलाला अद्याप फरार असल्यानं पोलिसांसमोर त्याला पकडण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
Nanded Crime News : रविवारच्या हत्येच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल
नांदेड शहरातील रविवारी पहाटेच्या सुमारास कॅनाल रोड परिसरात दोन गटात हाणामारी होऊन दोन्ही गटातील मिळून तिघांचा मृत्यू झाला होता. या घटनेत अर्जितसिंग याचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याच्यावर हल्ला करणारा एक जण रस्त्यात मरण पावला, तर दुसरा जखमी मोहमद आवेज याला वैद्यकीय महाविद्यालय इथ उपचार करण्यासाठी नेण्यात आले होते. या ठिकाणी अर्जितसिंग याचा परिवारातील सदस्यांने जखमी आवेज याच्यावर हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडिओ आता समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ मध्ये नीतिशास्त्र मरताना स्पष्टपणे दिसत आहेत. तर रुग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान नुसतेच पाहत उभे असलेले दिसत आहेत. या प्रकरणात अर्जितसिंग याचा परिवारातील दोघांना पोलिसांनी तत्काळ अटक केलेली आहे.
Nanded Crime news: पोलिसांनी या घटनेबाबत कोय म्हटलंय?
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास दोन टोळ्यांच्यामध्ये ही घटना घडली आहे, ही घटना ई-स्क्वेअर परिसरात घडली. त्या ठिकाणी दोन्ही टोळीमधील तिघे जण गंभीर जखमी झाले होते. दोन्ही टोळ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी आहे. या एका टोळीतील अनिल पंजाबी हा सध्या जेलमध्ये आहे. यामधील साहिल देखील दोन महिन्यापूर्वी जेलमधून बाहेर आला होता. त्यांच्या टोळीवरती आधी देखील कारवाई झालेली आहे, त्या टोळीतील काहींवर आधीही कडक कारवाई झालेली आहे, तर दुसरीकडे अर्जितसिंघ चव्हाण याच्यावर देखील नऊ गुन्हे दाखल होते, त्यांच्यासोबत आणखी एक आरोपी होता ज्याला आम्ही ताब्यात घेतले आहे, जो जखमी आहे, त्याच्यावर देखील 2025 मध्ये कारवाई झाली होती, एकंदरीत दोन्ही डोळ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी आहे, पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाई देखील त्यांच्यावर केलेली होती, यांच्यावरती हद्दपार सारखी कारवाई देखील झालेली आहे. या दोन्ही टोळ्यांच्या वादामध्ये एका टोळीतील अरबाज आणि आवेज या दोघांचाही मृत्यू झालेला आहे तर दुसरी बाजू म्हणजे अर्जितसिंघ चव्हाणचा देखील मृत्यू झालेला आहे, या टोळीच्या घटनेत एकंदरीत तीन जणांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.(Nanded Crime news)
इतर महत्त्वच्या बातम्या
आणखी वाचा