Raju Shetti opposes Shaktipeeth highway : ‘शक्तिपीठविरोधात आंदोलन उभारून सांगली परिसरातून हा महामार्ग पिटाळण्यात यशस्वी झालो आहोत. नवीन आखणीतूनही हा महामार्ग होऊ देणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.
स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. संघटनेचे संदीप राजोबा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, ‘पूर्वीचा शक्तिपीठ १२ जिल्ह्यांतून होता. त्यात आता साताऱ्यांची भर पडली. हा महामार्गच अव्यवहार्य असून, या प्रकल्पातून तब्बल ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. या महामार्गामुळे शिराळा तालुक्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
धार्मिक कारण पुढे करून रस्त्यांच्या कामातून पैसे कमावणे हा एकमेव उद्देश आहे. शक्तिपीठच्याभरावामुळे सांगली परिसरातील महापूर टळला आहे. आता नव्या मार्गाने कऱ्हाडपासून ते पाटणपर्यंतच्या गावांना महापुराचा फटका बसणार आहे. नागपूर-गोवा प्रवासाचे उदाहरण देत महामार्गाच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
ते म्हणाले, ‘नागपूर ते गोवा विमानाचे तिकीट साडेतीन हजारात आणि प्रवास दोन तासात होतो. पण कारने गेल्यास केवळ डिझेलवर ११ हजार रुपये खर्चून आठ तास महामार्गावरून का जाईल?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एका उद्योगपतीच्या खनिज वाहतुकीसाठी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
Shaktipith Highway route villages : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांची यादी आली; असा आहे मार्गकर्जमाफीचा गरजूंना लाभ नाही
शेट्टी म्हणाले, ‘राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जमाफीची घोषणा केली असली, तरी त्याचा लाभ खऱ्या अर्थाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नाही. या वर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले. त्या काळात अनेक शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी कर्ज काढले. त्यांना कर्जमाफीची सर्वाधिक गरज आहे. मात्र, या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत नसल्याने ते कर्जमाफीच्या निकषात बसत नाहीत. मध्यम मुदतीत कर्जे घेणाऱ्यांनाही ती लागू करावी, तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांना दीड लाख प्रोत्साहन अनुदान द्यावे.