निरोगी आरोग्यासाठी बाबा रामदेवांचा जादुई कानमंत्र,कुटूंबाने करावेत ही आसने
Marathi April 09, 2026 04:25 AM
योगासाठी बाबा रामदेव ओळखले जातात. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाला नवीन ओळख मिळवून दिलेली आहे. तसेच पतंजलीद्वारे आयुर्वेदातील जुन्या पद्धती घरा-घरात पोहचवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. योग शरीरासाठी किती आवश्यक आहे हे सर्वांना माहिती आहे. नियमित योगा केल्याने अनेक गंभीर आजार दूर राहतात. हल्ली प्रत्येक कुटूंबातील व्यक्तीला कोणता ना कोणता शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे. यामध्ये कुटूंबातील लहानग्यांचाही समावेश आहे. त्यामुळे आज आपण बाबा रामदेव यांनी कुटूंबाच्या निरोगी आरोग्यासाठी काही योगासने करण्याचा सल्ला दिला आहे ती जाणून घेऊयाात.
कपालभारती
कपालभारती हे पोट आणि पचनाशी संबंधित समस्यांसाठी सर्वात उत्तम आहे. या आसनाच्या सरावाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. त्यामुळे संपूर्ण कुटूंबाच्या निरोगी आरोग्यासाठी कपालभारतीचा सराव करायला हवा.
कसे कराल?
पाठीचा कणा सरळ ठेवून मांडी घालून डोळे मिटून बसावे.
हात गुडघ्यावर ठेवा, तळवे आकाशाच्या दिशेने ठेवावेत.
एक दीर्घ श्वास घ्या आणि पोटाचे स्नायू आत खेचून नाकाने वेगाने श्वास बाहेर टाका.
एक लक्षात घ्या श्वास सोडताना पोट आत गेले पाहिजे.
सुरुवातीला दर सेकंदाला एक या गतीने श्वास सोडावा. हे साधारण 20 वेळा करावे.
हा प्राणायम सकाळी रिकाम्या पोटी करणे सर्वात उत्तम आहे.
अनुलोमविलोम –
अनुलोम विलोम
मानसिक शांतता, रक्त शुद्धी आणि श्वसनाचे विकार असल्यास दूर करण्यासाठी अनुलोम विलोमचा सराव करावा.
कसे कराल?
हवेशील जागी पद्मासनात बसावे. डोळे बंद करा आणि मन शांत ठेवावे.
आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डावीकडून हळूवार श्वास घ्या.
नंतर डावी नाकपुडी बंद करून उजवीकडून श्वास सोडा.
हा सराव 5 ते 10 मिनिटे करा.
पवनमुक्तासन
वारा-रिलीव्हिंग पोझ
बद्धकोष्ठता आणि गॅसच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी आणि संपूर्ण कुटूंबाचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी पवनमुक्तासन करावे.
कसे कराल?
योगा मॅटवर शवासनात झोपावे. पाय सरळ ठेवावेत आणि हात शरीराच्या बाजूला ठेवावेत.
श्वास सोडताना उजवा गुडघा दुमडून छातीकडे आणा आणि दोन्ही हातांनी गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा.
श्वास सोडत असताना डोके आणि खांदे जमिनीवरून वर उचला आणि हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
संथ श्वास घेत 10 सेकंद या स्थितीत थांबावे.
आता श्वास घेत हळूहळू डोके आणि पाय जमिनीवर आणावेत.
हीच कृती डाव्या पायाने करा आणि नंतर दोन्ही पाय एकत्र दुमडून करावी.
भ्रामरी प्राणायाम
भ्रामरी प्राणायाम
हल्ली लहान मुलांपासून मोठ्यांपर्यत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस आहे. अशा परिस्थितीत मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी भ्रामरी प्राणायाम करावे.
कसे कराल?
जमिनीवर चटई टाकून पद्मासनात ताठ बसावे.
दोन्ही हातांची तर्जनी कानाच्या पाळीवर ठेवा. मधली बोटे डोळ्यांवर अनामिका नाकावर आणि करंगळी ओठांच्या खाली हलक्या हाताने ठेवावेत.
आता तोंड बंद ठेवा आणि नाकाने श्वास घ्या.
श्वास सोडल्यानंतर काही सेकंद शांत बसा आणि ही प्रक्रिया 5 ते 6 वेळा करावी.
मकरासन
हल्ली कित्येकजणांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास आहे. यापासून आराम मिळण्यासाठी मकरासन तुम्ही करायला हवे. हे पाठीच्या आणि मणक्याच्या समस्या कमी करणारे, शरीराला विश्रांती देणारे उत्तम साधन आहे.
कसे कराल?
योगा चटई पोटावर सरळ झोपावे आणि दोन्ही हात शरीराच्या कडेला ठेवावेत.
यानंतर दोन्ही पाय थोडे लांब ठेवावेत आणि टाचा एकमेकांच्या बाजूला राहतील अशा स्थितीत ठेवा.
कोपर वाकवून दोन्ही हात खांद्याच्या रुंदीवर ठेवावेत.
तळहात जमिनीवर टेकवून कपाळ किंवा हनुवटी हातांवर ठेवा. शरीर पूर्णपणे सैल सोडा आणि नैसर्गिक श्वासोच्छवास सुरू ठेवा. मणक्यावर लक्ष केंद्रित करा.