Quick & Nutritious Breakfast Ideas: उन्हाळ्यात उकाडा सहन करणं कठीण वाटतं, आणि या काळात फक्त तहान जास्त लागते त्यामुळे सकाळी नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ हलकंच खावंसं वाटतं. म्हणूनच आम्ही तुमचं टेन्शन दूर करायला एक सोपी आणि जबरदस्त हेल्दी रेसिपी घेऊन आलो आहोत. घरातच उपलब्ध असणाऱ्या सामानापासून बनणारी ही जाळीदार धिरड्याची रेसिपी फक्त ५-१० मिनिटातं तयार होते. चला तर मग पाहूया ही सोपी रेसिपी...
साहित्य (२–३ लोकांसाठी)१ कप बेसन
१ कप रवा
१ कप तांदळाचे पीठ
१ टीस्पून मटकीचे पीठ
१ कांदा, बारीक चिरलेला
१ गाजर, किसलेली
२–३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेल्या (चवीप्रमाणे)
काही कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली
थोडी कोथिंबीर, चिरलेली
पाणी, गुठळ्यांशिवाय गुळगुळीत बॅटर बनवण्यासाठी
तेल, शिजवण्यासाठी
मोठ्या वाडग्यात बेसन, रवा, तांदळाचे पीठ आणि मटकीचे पीठ एकत्र करा. त्यात कांदा, किसलेलं गाजर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून नीट मिक्स करा. हळूहळू पाणी घालून गुळगुळीत आणि पसरता येईल असा बॅटर तयार करा, जो पॅनकेक सारखा असावा. नॉन-स्टिक पॅन किंवा तव्यावर थोडे तेल लावा आणि मध्यम आचेवर गरम करा. नंतर बॅटर पळीने पॅनवर ओता आणि हलकेच पसरवा. त्यावर आणि कड्यांवर थोडे तेल लावा. तळ बाजू सोनेरी रंगाची झाल्यावर धिरडां उलटा आणि दुसरी बाजूही शिजवा. शेवटी गरम गरम धिरडं सर्व्ह करा. हे धिरडं उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा असून लहान मुलांनाही खूप आवडतं.
टीप्सपौष्टिकतेसाठी बारीक चिरलेला पालक किंवा झुकिनीही घालू शकता.
मिरचीचे प्रमाण पाहून चवेत आवश्यक ते बदल करा.
चटणी किंवा दहीसोबत खाल्ल्यास अजून स्वादिष्ट लागते.