Dowry Harassment Allegations Against Husband and Family : छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक छळाच्या गंभीर प्रकारामुळे एका २५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ईश्वरी बनकर असे मृत महिलेचे नाव असून, सततच्या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन जीवन संपवले.
याप्रकरणी छावणी पोलिसांनी पती अजय अशोक बनकर याच्यासह एकूण सात जणांना अटक केली आहे. ईश्वरीचा विवाह २८ जून २०२० रोजी अजयसोबत झाला होता. विवाहानंतर दोघे भावसिंगपुऱ्यातील श्रावस्ती कॉलनी येथे राहत होते.
Sangli Crime : रक्ताळलेली सांगली! 4 दिवसांत 6 खून; कुपवाडमध्ये पत्नीनेच पतीला संपवलं, तर कवलापूरच्या यात्रेत अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्यामाहितीनुसार, अजय हा दररोज दारूच्या नशेत घरी येऊन ईश्वरीला मारहाण करीत असे. शारीरिक आणि मानसिक छळासोबतच सासरकडील इतर नातेवाईकही तिला त्रास देत होते. काही दिवसांपूर्वी तर भाजीत केस निघाल्याच्या किरकोळ कारणावरूनही तिला निर्दयपणे मारहाण करण्यात आली होती.
ईश्वरीने हा छळ आपल्या आई-वडिलांना सांगितला होता. त्यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत एकत्र राहण्याचा सल्ला दिला. मात्र, अजयच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही.
Silver Trader Death : सांगलीतील 24 वर्षीय चांदी व्यावसायिकाचा कोल्हापुरात संशयास्पद मृत्यू; चांदीच्या पार्सलमध्ये आढळलं तांबं, घटनेने मोठी खळबळदरम्यान, ईश्वरीच्या वडिलांनी लग्नावेळी अजयला ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, २ तोळ्यांची साखळी, मुलीसाठी ५ तोळे सोने, तसेच २ लाख रुपयांचा हुंडा, फ्रिज, कूलर, सोफा आणि इतर घरगुती साहित्य दिले होते. तरीही अजय सतत माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीवर दबाव टाकत होता. त्याने घेतलेल्या प्लॉटचे हप्ते देखील सासऱ्यांनी भरावेत, अशी मागणी तो करत होता.
या सततच्या छळाला कंटाळून ईश्वरीने अखेर टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. घटनेनंतर छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.