Manjeri Oak: मराठी मनोरंजन विश्वात प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे लोकप्रिय जोडपं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात प्रहसनांवर मिश्किल प्रतिक्रिया देणारा अभिनेता प्रसाद ओक कायम चर्चेत असतो.केवळ प्रसाद ओक नाही तर त्याची बायको मंजिरी ओकही (Manjari Oak) रिल्समुळे घराघरात पोहोचली आहे. मंजिरी ही निर्मातीही आहे. अलीकडेच प्रसाद ओक आणि मंजिरी ओक लेकाच्या साखरपुड्यामुळे चर्चेत होते. दोन-तीन महिन्यांपूर्वी प्रसाद आणि मंजिरीच्या मुलाचा साखरपुडा झाला. (Prasad Oak Manjiri Oak) साखरपुड्यातील फोटो व्हायरल झाल्यामुळे मनोरंजनसृष्टीसह अनेक चाहत्यांनीही दोघांवर भरभरून अभिनंदनच वर्षाव केला. योगायोग म्हणजे एकीकडे 'लाडकी विहीण योजना ' नावाचं नाटक मंजिरी करत होती त्याचवेळी ती खऱ्या आयुष्यातही विहिणीची भूमिका निभावत होती. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लेकाच्या साखरपुड्याविषयी, सुनेविषयी सांगितलंय. तिच्या प्रतिक्रियेची सध्या चर्चा रंगलीय.
लेकाच्या साखरपुड्याबद्दल बोलताना ती म्हणाली, " इंडस्ट्रीतील अनेकांना माझ्या मुलाचा साखरपुडा झाला याचा शॉक बसला. अनेकजण म्हणाले दोघं खूप लहान आहेत. लहान वयात मुलांचं लग्न करताय का ? पण तसं नाहीय. पण, तसं नाही, आम्ही आता मुलाचं लग्न करण्याच्या मार्गावर आहोत. माझा मुलगा आता 25 वर्षांचा आहे.तो जर्मनीला असतो.तो शिकला तिथेच.तिथेच नोकरी करतो.बऱ्यापैकी सेटल आहे.अर्थात त्याला खूप काम करायचा आहे.पण तरीही हळूहळू त्याची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.त्यामुळे असं वाटलं की त्याला साखरपुडा करून टाकूया. आणि हा साखरपुडा खूप अचानक ठरला.आमच्यासाठीही अचानक होतं.अर्थात त्यामुळेच कुठे त्याचा गाजावाजा करणार नव्हतं. पण आमची मैत्रीण अमृता खानविलकर तिने एक स्टोरी टाकली आणि ते अर्थात सगळ्यांना कळलं. अर्थात ती वाईट गोष्ट नाही, चांगलीच गोष्ट आहे. माझा मोठा मुलगा सोशल मीडियापासून जरा लांब आहे.त्यामुळे तो जरा concious आहे याबाबतीत. पण ठीक आहे, ज्यांना कळलं त्यांच्या आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे गेलो. "असं मंजिरी यांनी सांगितलं.
मंजिरी ओक म्हणाल्या" माझा मोठा मुलगा जर्मनीला शिकायला आहे. नंतर नोकरी लागली.तोही 18 व्या वर्षी तिकडे गेला.एक तर राहत होता कितीतरी वाईट अनुभव आले असतील.ते त्याचे त्याचे त्याच्या पद्धतीने डील केले. तो अत्यंत जबाबदार मुलगा आहे. तो एका व्यक्तीची जबाबदारी घेणार आहे. जिची जबाबदारी घेणार आहे तीही जबाबदार आहे. घरातल्या कुठल्याही मुला मुलीचे लग्न ठरलं की आई बाप हळवे होतात. "
" माझ्या नशिबाने माझी सून उत्तम सुगरण आहे. मारवाडी तर ती करतेच पण मराठी पदार्थ उत्तम शिकलेत तिने. तिला खूप आवड आहे. " असं मंजिरी म्हणाल्या.
ज्या महिला सासू होणार आहेत, किंवा झाल्या आहेत त्यांच्यासाठी मंजिरी यांनी सांगितलं , "सुनेशी वाकताना काही ठरवून नाही वागलं पाहिजे. ते काही 1+1=2 असं गणित नाही. दोन माणसे एकत्र येणार आहेत. आपल्याकडे सासू आणि सून या नात्याला इतकं ग्लॅमर आहे. माझ्या होणाऱ्या सुनेने मला विचारलं की 'काकू, लोक विचारता आहेत की ही सासू आहे का ?' त्यावर तिची आई तिला ओरडली की आता काकू नाही आई म्हणायचं. त्यावर मी त्यांना असं सांगितलं ' आई एकच असते. जी जन्म देते ती आई असते.तिने मला आई म्हणावं याचा तिच्यावर अट्टाहास करू नका. मलाही नकोय तिने मला आई म्हणावं. आई म्हणावं आणि मनात आईसारखी भावना नसेल त्यापेक्षा नको. त्यापेक्षा आई नको म्हणून आणि मनात आईसारखे भावना ठेव.' असं मंजिरी म्हणाल्या.