Akola Crime News : अकोला शहरात एक अतिशय हादरवणारी घटना घडली आहे. यात पतीकडूनच पत्नीची हत्या (Akola Crime News) करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील मारेकरी पतीचा आपला 8 वर्षाच्या मुलाला संपवण्याचा (Crime News) कट होता. मात्र, मुलाला वाचवण्यासाठी आलेल्या आईची यात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, हे कृत्य केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची (Crime) माहिती दिली आहे. हा घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास तपास करत आहे.
Akola Crime News: आरोपीने स्वतः रुग्णालयात दाखल केलं, नंतर स्वतः पोलिसांसमोर हजर
मिळालेल्या माहितीनुसार, वृषाली निंबोकार असं मृत पत्नीचे नाव आहे, तर अनिल निंबोकार असं मारेकरी पतीचे नाव आहे. आरोपी अनिल हा अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. दरम्यान आज सकाळच्या सुमारास अनिल निंबोकार हा घरात मुलाला मारत असल्याचे दिसताच पत्नी वृषाली ही मध्ये आली. त्यानंतर पतीचा राग अनावर झाला आणि त्याने धारदार शास्त्राने तिच्या पोटात वार करत तिला गंभीर जखमी केलं. घटनेनंतर आरोपीने स्वतः तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित दाखवलं. त्यानंतर आरोपी स्वतः पोलिसांसमोर हजर झाला. या घटनेनंतर दोन्ही मुलांचं आई-वडिलांचे छत्र हरवले आहे. या थरारक घटनेने शहर हादरलं असून सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहे.
Crime News: देशी कट्ट्यासह दहशत गाजवणारा युवकाला अटक
यवतमाळ शहरात बेकायदेशीररित्या देशी कट्टा बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या वीस वर्षीय युवकाला शहर पोलीस ठाण्याच्या डीपी पथकाने अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला. ही कारवाई रात्रीच्या सुमारास करण्यात आली असून कुणाल गीते असे अटक करण्यात आलेल्या युवकांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल गीते हा शहरातील पिंपळगाव ते धामणगाव रोडवर कमरेला देशी कट्टा लावून फिरत आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित कुणाल गीते याला ताब्यात घेत त्याच्याकडून देशी कट्टा जप्त करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या