खड्डेमुक्त मुंबईसाठी १०० कोटी
esakal April 09, 2026 09:45 PM

खड्डेमुक्त मुंबईसाठी १०० कोटी
पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचा मानस
मुंबई, ता. ९ : पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने शहर, उपनगरांतील रस्त्यांसाठी तब्बल १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्यात होणाऱ्या दुर्दशेमुळे प्रशासनाने काँक्रीटच्या रस्त्यांवर भर दिला आहे. एक ते दोन वर्षांत मुंबईतील बहुतांश रस्ते काँक्रीटचे करण्याचे नियोजन आहे. पालिका प्रशासनाकडून मुंबईतील २,११८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील खर्चामध्ये बचत, कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने मास्टिक वापराचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी तीन हजार मेट्रिक टन मास्टिक वापरण्यात आले होते. त्याऐवजी यंदा दोन हजार मेट्रिक टन मास्टिक वापरून खड्डे बुजवण्याचे उद्दिष्ट आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.