KKR vs LSG Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, केकेआरमध्ये मॅचविनर परतला, विजयाचं खातं उघडणार?
GH News April 09, 2026 10:13 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 15 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स भिडणार आहेत. केकेआरचा हा चौथा तर लखनौचा तिसरा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे केकेआरचं होम ग्राउंड असलेलं कोलकातील इडन गार्डन्समध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. लखनौच्या बाजूने टॉसचा कॉल लागला. कॅप्टन ऋषभ पंत याने फिल्डिंगचा निर्णय घेत केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. केकेआर आता लखनौसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

केकेआर पहिला विजय मिळवणार?

केकेआरसमोर लखनौ विरूद्धच्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे. केकेआरला पहिल्या 2 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. तर केकेआरचा इडन गार्डन्समधील तिसरा आणि शेवटचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळाला. त्यामुळे केकेआरचं खातं उघडलं. मात्र केकेआरला पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे केकेआर लखनौ विरुद्ध प्रतिक्षेचं गेम ओव्हर करणार करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

लखनौचं समीकरण काय?

लखनौ विजय सलामी देण्यात अपयशी ठरली. मात्र लखनौने 5 एप्रिलला हैदराबादला पराभूत करुन पहिला विजय नोंदवला. त्यामुळे लखनौ तिसऱ्या सामन्यात सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

केकेआरला पहिल्या विजयसासाठी काय करावं लागेल?

केकेआरच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना चांगली सुरुवात मिळतेय. अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी या मुंबईकर फलंदाजांनी जबरदस्त सुरुवात केली. उपकर्णधार रिंकु सिंह याने 2 सामन्यांत 30 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. मात्र कॅमरुन ग्रीन याला त्याच्या लौकीकाला आणि महागड्या प्राईज टॅगला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे ग्रीन लखनौ विरुद्ध कमबॅक करतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कॅप्टन), फिन ऍलन, कॅमेरुन ग्रीन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), रिंकू सिंह, रोवमन पॉवेल, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, सुनील नरेन, नवदीप सैनी आणि कार्तिक त्यागी.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श, एडन मार्कराम, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटीपर), निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मनिमरन सिद्धार्थ, आवेश खान, मोहम्मद शमी, दिग्वेश सिंग राठी आणि प्रिन्स यादव.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.