मद्यधुंद कारचालकाचा निष्काळजीपण, नागपूरमध्ये भीषण अपघात, वयस्कर पती-पत्नीचा मृत्यू
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर April 09, 2026 10:13 PM

Nagpur Accident News : नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मद्यधुंद कारचालकाच्या निष्काळजीपणामुळं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ज्येष्ठ नागरिक पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. बेलतरोडी पोलीस हद्दीत काल मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. उपचारादरम्यान जखमी पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनिष नगर-बेसा मार्गावरील पूर्ती बाजार परिसरात काल मध्यरात्रीच्या दरम्यान हा अपघात घडला. मद्यप्राशन करून भरधाव वेगात कार चालवत असलेल्या पंकज डेकाटे या बँक अधिकाऱ्याने दुचाकीवरील विजय सावरकर आणि सुरेखा सावरकर या दाम्पत्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दांप्मत्य कारखाली बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत गेलं. दरम्यान, अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ मेडिकलमध्ये दाखल केलं. मात्र, आज उपचारादरम्यान दोघांचे ही.मृत्यू झाले आहे. बेलतरोडी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरू आहे.

अयोध्येला गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील बसचा वाराणसी-गोरखपूर मार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे परिसरातील 44 भाविकांना अयोध्या व वाराणसी धाम व तेथून नेपाळकडे  दर्शनासाठी घेऊन गेलेल्या खाजगी बसला वाराणसी जवळ भीषण अपघात झाला. उत्तर प्रदेशातील नादगंज जवळील नवसारा येथे रोडच्या रेलिंगला ही बस धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिनखेड येथील सरस्वती पाखरे तर अकोला जिल्ह्यातील अन्नपूर्णाबाई  अशा 2 महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर 35 जण या अपघातात जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती परिसरात धडकताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोन व्यक्ती गंभीर जखमी

वाहतूक कोंडीमुळं मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली आहे. दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात नागरिकाने पाय गमावला आहे. इंदूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे..मनमाड - मालेगाव चौफुली येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दोन व्यक्तीना इंधन भरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने अपघात घडला आहे.  या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहे.. त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.