Nanded News: जिल्ह्यात सव्वा लाख मेट्रिक टन खतसाठा; खरीप हंगामासाठी मुबलक साठा; तुटवडा भासणार नाही
esakal April 10, 2026 12:45 PM

नांदेड: आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात खताचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना तुटवड्याचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यात विविध प्रकारच्या खतांचा मिळून सुमारे एक लाख २५ हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे.

जिल्ह्यात युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके व एसएसपी या प्रमुख खतांचा पुरेसा साठा आहे. युरियाचा सरासरी वापर ६२ हजार मेट्रिक टन आहे. मागील खरीप हंगामात ५६ हजार मेट्रिक टन खत प्राप्त झाले होते. मार्च २०२६ अखेरही युरियाचा शिल्लक साठा समाधानकारक आहे.

डीएपी खताचा सरासरी वापर ३१ हजार मेट्रिक टन असून मागील वर्षात ४८ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले होते. सध्या याचा २१ हजार मेट्रिक टनांहून अधिक साठा आहे. एमओपी खताचा १५ हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे.

एनपीके खतासाठी ३२ हजार मेट्रिक टन पुरवठा करण्यात आला असून शिल्लक साठादेखील समाधानकारक आहे. एसएसपी खताचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून ९६ हजार मेट्रिक टन खत मागील वर्षात उपलब्ध झाले होते.

Nanded News: काम अपूर्ण, बिल मात्र दिले पूर्ण; सीसी रस्ताकामाचे कंत्राटदाराला एक कोटी ७९ लाखांचे बिल घाईगडबडीत खत खरेदी करू नये

कृषी विभागाने एप्रिल महिन्यातील वितरण व पुरवठा लक्षात घेता, शेतकऱ्यांनी घाईगडबडीत खत खरेदी करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. उपलब्ध साठा व नियोजित पुरवठा यामुळे संपूर्ण खरीप हंगामात खताची कमतरता भासणार नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

काळाबाजार रोखणार

जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडून खत वितरणावर लक्ष ठेवले जात असून काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खत खरेदी करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

खरीप हंगामातील खतसाठा (मे. टनात)
  • युरिया:

  • सरासरी वापर: ६२,१८८

  • वितरण : ६०,२००

  • सध्याची शिल्लक : २१,९४३

  • डीएपी:

  • सरासरी वापर : ३१,१५५

  • वितरण : ३२,३००

  • सध्याची शिल्लक : १५,९९४

  • एनपीके:

  • सरासरी वापर : ७२,३५२

  • वितरण : ८५,३००

  • सध्याची शिल्लक : ६१,७००

Premium|Carolina Marin retirement : आक्रमक, वेगवान, ताकदवान खेळाची सांगता; जागतिक बॅडमिंटनची स्पॅनिश सम्राज्ञी कॅरोलिना मरीन कोर्टला अंतिम निरोप

"अमेरिका-इराण युद्धामुळे मागील महिन्यात काही ठिकाणी खताचा तुटवडा जाणवत होता. परंतु पुरवठा सुरळीत असून खताचा साठा शिल्लक आहे."

- नीलकुमार ऐतवाडे,

जिल्हा कृषी विकास अधिकारी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.