Siblings Day Wishes : भावंड दिन करा साजरा, पाठवा ताई दादाला या प्रेमळ शुभेच्छा
Marathi April 10, 2026 02:25 PM

भाऊ-बहिण एकमेकांशी कितीही भांडले तरी त्यांना एकमेकांवाचून करमत नाही हे तितकंच खरं आहे. दोघांच एकमेकांवर नितांत प्रेम पण जगासमोर मात्र वैरी.. असं चित्र आपण कित्येक घरात पाहतो तर काही घरात एकमेकांशी अनेकदा भांडणारी भावंडं आई-बाबांसमोर एकमेकांच्या चुका लपवताना दिसतात. असं म्हणतात की, तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमच्या दादा-ताईशी असलेलं तुमचं नातं कधीच बदलत नाही. या नात्यातील बंध कायम तसाच असतो. हा बंध कायम टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी 10 एप्रिल रोजी भावा-बहिणीचा दिवस National Sibilings Day साजरा केला जातो. याचदिनानिमित्ताने तुम्ही तुमच्या दादा -ताईला किंवा लहान भावंडांना प्रेमळ शुभेच्छा पाठवू शकता.

रात्रंदिवस भांडण, पण तरीही एकमेकांशिवाय पान न हलणे, हेच खरे भावंडांचे नाते !
भावंड दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आनंद असो वा दुःख, माझ्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या माझ्या दादा किंवा ताईला भावंड दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!

तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव
राष्ट्रीय भावंड दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!

जगातील सर्वोत्तम भाऊ आणि बहिणीला राष्ट्रीय भावंड दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!

राष्ट्रीय भावंड दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, तुझ्यामुळेचं माझ्या आयुष्यात आनंद आहे. आपण असंच एकत्र राहूया !!

तू आणि मी एकत्र मोठे होत आहोत. जेव्हा गरज पडेल तेव्हा नक्की मला आई-बाबांच्या ओरड्यापासून वाचव दादा किंवा ताई..
भावंड दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!

हेही वाचा – National Sibilings Day : भावंडांसोबतचं नातं घट्ट करण्यासाठी करा या गोष्टी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.