Rohit Pawar: पार्थ पवार यांच्या विधानाबद्दल रोहित पवारांची दिलगिरी; आगामी कालावधीत सर्वांनी एकत्र येणे गरजेच!
esakal April 10, 2026 12:45 PM

मुंबई: खासदार पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाबाबत केलेल्या वक्तव्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्या विधानाबद्दल आज दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Pune Ring Road: पुण्यातील अखेर रिंगरोड प्रकल्पाला गती; ११ गावांतील जमिनींची मोजणी पूर्ण, भरपाई दर निश्चित!

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घ्यावी, अशी विनंती करण्यासाठी रोहित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आज भेट घेतली. ‘‘पार्थ यांचे विधान चुकीचे होते आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु, आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,’’ असे रोहित पवार यांनी सपकाळ यांना सांगितले.

उमेदवार माघारीबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘‘अजित पवार यांच्यासारखा मोठा नेता गेल्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक भावनिक स्तरावर पाहणे गरजेचे आहे. मात्र, एवढा मोठा नेता गेल्यानंतर त्या नेत्याच्या मृत्यूचा एफआयआर होत नसेल, तसेच तपासाला गती मिळत नसेल तर मग या महाराष्ट्रात शासन आणि प्रशासन सामान्य माणसांना कसा न्याय देणार, अशी काँग्रेसची भूमिका असल्याने याच मागणीसाठी त्यांनी तिथे उमेदवारी दिली.

Secondary Education: माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय! ३८२ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रोखणार; नेमकं काय कारण?

पण तरीही, कुटुंबातील एक व्यक्ती आणि अजित पवार यांचा एक कार्यकर्ता म्हणून आज त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली,’’ असे रोहित पवार यांनी सांगितले. दरम्यान, या चर्चेनंतर काही वेळानंतर काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.