Hadawal-Myth or Reality : हडवळ रात्रीच का मागे लागते? भीतीमागचं सत्य आणि विज्ञान घ्या जाणून
admin April 10, 2026 06:25 PM
[ad_1]
Hadawal-Myth or Reality : हडवळ रात्रीच का मागे लागते? भीतीमागचं सत्य आणि विज्ञान घ्या जाणून

Hadawal: Myth or Reality: ‘हडवळ’ किंवा ‘हडळ’ याविषयी तुम्ही अनेक स्टोरी ऐकल्या असतील. रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करताना किंवा अडवळतून जाताना हडळीने मागे लागल्याच्या अनेक स्टोरी तुम्ही ऐकल्या असतील. पण हडवळ नक्की काय असते? विज्ञानाच्या युगात आपण याकडे कसं पाहावं? त्यामागील वैज्ञानिक कारण काय आणि मानसिक भीती, यासह तज्ज्ञ काय म्हणतात, हे देखील जाणून घेऊया.

हडवळ म्हणजे नक्की काय?

असं म्हटलं जातं की, ज्या स्त्रीचा बाळंतपणात किंवा इच्छा अपूर्ण असताना मृत्यू होतो, तिचा आत्मा तृप्त न झाल्यामुळे ती ‘हडवळ’ बनते, अशी समजूत आहे. असे मानले जाते की, ती सुंदर स्त्रीचे रूप धारण करून रात्रीच्या वेळी भटकते. तिचे पाय उलटे असतात आणि ती वारंवार खिदळते किंवा हसते, असे बोललं जातं. आता मानसोपचारतज्ज्ञ काय म्हणतात, हे जाणून घेऊया.

तज्ज्ञ काय म्हणतात?

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या वेळी एकटे असताना वाटणारी भीती ही केवळ आपल्या सुप्त मनातील विचारांचा परिणाम असते. आता वैज्ञानिक कारण काय आहे आणि मानसिक भीती नेमकी कशी बसू शकते, याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

वैज्ञानिक कारण काय आणि मानसिक भीती

पॅरेडोलिया (Pareidolia): अंधारात झाडांच्या सावल्या किंवा आकार माणसांसारखे दिसणे हा मेंदूचा एक भ्रम असतो, याला वैज्ञानिक भाषेत ‘पॅरेडोलिया’ म्हणतात.

ऑडिटरी हॅल्युसिनेशन: वाऱ्याचा आवाज किंवा पानांची सळसळ आपल्याला कोणीतरी हसल्यासारखी किंवा चालल्यासारखी वाटू शकते.
मानसिक भीती: जेव्हा माणूस आधीच घाबरलेला असतो, तेव्हा त्याचे मन काल्पनिक भीती निर्माण करते.

घाबरून न जाता ‘हा’ मंत्र म्हणा

अशा परिस्थितीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. भीती ही नकारात्मक ऊर्जेचे खाद्य असते. जर तुम्हाला भीती वाटत असेल, तर खालीलपैकी कोणत्याही एका मंत्राचा किंवा देवाच्या नावाचा जप करणे अत्यंत प्रभावी मानले जाते.

हनुमान चालीसा
“भूत पिशाच निकट नहीं आवै। महावीर जब नाम सुनावै।।”
हनुमानजींना सर्व नकारात्मक शक्तींचे मर्दन करणारे दैवत मानले जाते. या ओळीचा जप केल्याने मनातील भीती त्वरित दूर होते.

शिव पंचाक्षरी मंत्र:
“ॐ नमः शिवाय”
भगवान शिव यांच्या नावाच्या स्मरणाने कोणत्याही प्रकारची बाधा जवळ येत नाही.

दत्तू महाराज मंत्र:
“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”
महाराष्ट्रात दत्त महाराजांच्या नामस्मरणाने मनोबल वाढते, अशी दृढ श्रद्धा आहे.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.