यापुढे कोणत्या लाडक्या बहिणींना ₹ १५०० मिळणार; eKYC वर बोलताना आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट
Saam TV April 10, 2026 06:45 PM

Ladki Bahin Yojana eligibility after eKYC Maharashtra update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना १५०० रूपयांची आर्थिक मदत केली जाते. पण ईकेवायसीनंतर नेमकी प्रक्रिया काय असेल? कुणाचा लाभ बंद होणार? कधीपासून बंद होणार? यासारखे प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना सतावत आहेत. तसेच ईकेवायसी का केली? असाही प्रश्न उपस्थित झालाय. याचं उत्तर महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे. रायगडमध्ये बोलताना आदिती तटकरे यांनी ईकेवायसी आणि पात्र लाडक्या बहिणींवर मोठं वक्तव्य केले आहे.

सप्टेंबर २०२५ पासून e kyc प्रक्रिया सुरु झाली आहे. वेळोवेळी त्याला मुदत वाढ दिली आहे. अनेक महिलांना KYC करताना अडचणी आल्या त्यांनी दिलेल्या सूचना आणि तक्रारीवरून ही मुदत वाढ दिली असून राज्य आणि केंद्र शासनाच्या लाभार्थी योजनांना बंधनकारक असते. त्यानुसार अंतिम यादीनुसार लाभ सुरू राहील, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे आता अनेक अपात्र महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. निकषात न बसणाऱ्या महिला, ईकेवायसी न केलेल्या महिलांचा प्रति महिना १५०० चा लाभ बंद होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. ईकेवायसीमध्ये दुरूस्ती करण्याची महिलांकडे ही शेवटची संधी असेल, असा अंदाज वर्तवला जातोय. कारण ईकेवायसीमध्ये यापुढे वाढ होण्याचा अंदाज कमीच आहे.

१७ एप्रिलपासून नियम बदलणार; HSRP प्लेट नसेल तर गाडीचे काम अडकणार, ₹१०००० चा दंडही बसणार

आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या ?

ईकेवायसीच्या प्रक्रियेची सुरूवात २०२५ सप्टेंबरपासून झाली. नोव्हेंबरपर्यंत पहिली मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये ३१ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर ३१ मार्च आणि आता ३० एप्रिलपर्यंत ईकेवायसी दुरूस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आली. अनेक महिलांनी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अथवा करत असताना अडचणी येत होत्या, त्यांनी आमच्याकडे सूचना आणि तक्रार दिल्या होत्या, त्यानुसार मुदतवाढ दिली. महिला लाभार्थी दिलेल्या मुदतीत दुरूस्ती करून सबमीट करत आहेत. ३० एप्रिलपर्यंत सर्व डेटा समोर येईल. राज्य सरकारच्या अथवा केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेसाठी सर्वांना ईकेवायसीची अनिवार्य आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे. ईकेवायसीनंतर योजनेचा लाभ सुरू राहील, असे आदिती तटकरे म्हणाल्या.

भररस्त्यात गंदी बात! धावत्या दुचाकीवरील तरुणीच्या टॉपमध्ये घातला हात, तरुणांची विकृती; Viral VIDEO

ईकेवायसीची शेवटचीच संधी ?

सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ , या काळात राज्यातील महिलांनी लाडकी बहीण योजसेनासाठी ईकेवायसी केली. पण ही प्रक्रिया करताना अनेकांच्या चूका झाल्या. काही प्रश्नांची उत्तरे चुकली. त्यामुळे राज्य सरकारकडून ईकेवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली. मार्च अखेरपर्यंत ईकेवायसीची मुदत होती. पण अवकाळी पावसामुळे अनेक महिलांना प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे आता एप्रिल अखेपर्यंत ईकेवायसी दुरूस्तीची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही केवायसीमध्ये माहिती अपडेट करण्याची ही अखेरची संधी असेल, यापुढे डेडलाइन वाढणार नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडकीच्या खात्यात किती रूपये जमा होणार? मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार ?

राज्य सरकारकडून राज्यातील महिलांच्या खात्यात गेल्या महिन्यात फेब्रुवारी २०२६ चा हप्ता जमा केली. पण आता एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. पण अद्याप मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही. त्यामुळे राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च महिन्याचा १५०० रूपयांचा लाभ कधी जमा होईल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मार्च महिन्याचे १५०० रूपये एप्रिल अखेरीस येणार की ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यात एकत्र ३००० हजार येणार, याची चर्चा सध्या सुरू आहे.

LPG गॅस सिलिंडरचे नियम बदलले, १ जुलैपर्यंत हे काम कराच अन्यथा बुकिंग नाही, PNG आता अनिवार्य
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.