होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
GH News April 10, 2026 07:16 PM

पश्चिम आशियातील तणावानंतर झालेल्या युद्धविरामानंतर इंधन वाहतूकीसाठी कळीची असलेल्या होर्मुझ स्ट्रेटमधून पुन्हा जहाजांची वाहतूक सुरु होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, ५ एप्रिलनंतर येथून कोणतेही भारतीय ध्वज लावलेले जहाज होर्मुझ पार करु शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौदल सध्याच्या स्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. आणि सुरक्षित वातावरण झाल्याची खात्री झाल्यानंतरच जहाजांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.

सध्या भारतीय ध्वज लावलेली १६ जहाजे होर्मुझच्या पश्चिम भागात ( फारसची आखात ) अडकलेले आहेत. या एलएनजी(LNG), एलपीजी(LPG) , कच्चे तेलाची वाहतूक करणारी जहाजे, कंटेरन जहाजे आणि ड्रेजर तसेच रासायनिक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या जहाजांचा समावेश आहे.

एलपीजीची वाहतूक करणारे ‘जग विक्रम’हे जहाज अजूनही शारजाह मध्ये उभे आहे आणि आदेशाची वाट पाहात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात ५ ते ६ जहाजांना लवकरच नौदलाचे क्लिअरन्स मिळाल्यानंतर होर्मुझ पार करता येणार आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार ५ ते ६ जहाजांची पहिली तुकडी लवकरच नौदलाच्या हिरव्या झेंडा मिळाल्यानंतर होर्मुझ पार करु शकणार आहे.या संदर्भात इराणचे अधिकारी आणि चालक दलाशी बोलणी सुरु आहेत. युद्धाच्या दरम्यान एकूण २५ भारतीय जहाजे या क्षेत्रात उपस्थित होती. ज्यातील ९ जहाजे आतापर्यंत होर्मुझ सुखरुपपणे पार करु शकले आहेत. भारतीय नौदलाच्या तैनातीत सध्या कोणताही बदल केलेला नाही. आणि एस्कॉर्ट मोहिम सतत सुरु आहे. नौदल सुरक्षित मार्गांवरुन जहाजांना मार्गदर्शन करत आहे आणि त्यांना ओमानच्या खाडीपर्यंत सुरक्षा देण्यात आली आहे.

अजूनही जोखीम कायम

गुरुग्राम स्थित भारतीय नौदलाच्या इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर–इंडियन ओशन रीजन (IFC-IOR)च्या माहितीनुसार युद्धाच्या सुरुवातीपासून ६ एप्रिलपर्यंत फारसची खाडी, होर्मुझ आणि ओमानच्या खाडीत ३० घटनांची नोंद झाली आहे. यात २३ जहाजांना टार्गेट करण्यात आले. ज्यात मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांचा समावेश होता, या घटनेत एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यांवरुन कळते की येथे  इराण युद्धानंतर किती अस्थिरता आणि जोखीम कायम आहे.

भारतीय नौदलाची सतर्कता आणि परस्पर समन्वयाने भारतीय जहाजे आणि कंटनर्सना सुरक्षित होर्मुझमधून आणले जात आहे. येत्या काही दिवसात होर्मुझमधून जहाजांची वाहतूक हळूहळू सामान्य होण्याची आशा आहे.

समुद्री व्यापाराला गती केव्हा ?

या दरम्यान इराणकडून मिळाल्या संकेतानुसार होर्मुझवर ते कठोर नियंत्रण आणण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे समुद्रातील या महत्वाच्या मार्गाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी हा जलमार्ग अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण जगातील इंधनाचा व्यापारापैकी मोठा हिस्सा येथूनच जातो. येत्या काही दिवसात येथे शांतता प्रस्थापित होईल अशी आशा व्यक्त केली जात असून पुन्हा समुद्री व्यापाराला गती मिळण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.