IPL 2026 : मुकुल चौधरीपासून सावध राहा..! अर्जुन तेंडुलकर सामन्यापूर्वीच केलं होतं अलर्ट
GH News April 10, 2026 07:16 PM

आयपीएल 2026 स्पर्धेची रंगत आता प्रत्येक सामन्यानंतर वाढत चालली आहे. प्रत्येक सामन्यात काही ना काही नवीन घडतं. कोणीतरी सामना जिंकण्यात मोलाचा हातभार लावत आहे. काही चर्चेत नसलेल्या चेहऱ्यांनी सामना काढला तर चर्चा होते. अशीच काहिशी चर्चा आता मुकुल चौधरीबाबत सुरू आहे. मुकुल चौधरीने कोलकाता नाईट रायडर्सचा पारड्यात असलेला सामना खेचून आणला. शेवटच्या 24 चेंडूत त्याने कमाल फलंदाजी केली. इतकंच काय 21 चेंडू एकटा खेळला आणि समोरच्या फलंदाजाला स्ट्राईक देणं टाळलं. 21 वर्षीय मुकुल चौधरीची बिनधास्त फलंदाजी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याने 27 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 54 धावा केल्या. पण प्रतिस्पर्धी संघांना अर्जुन तेंडुलकरने आधीच अलर्ट केलं होतं. पण त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्याने फटका बसला असं म्हंटलं वावगं ठरणार नाही.

लखनौ सुपर जायंट्सचा पावर हिटर मुकुल चौधरीबाबत आता सर्वांना माहिती झालं आहे. त्याची खेळी चर्चेत आहे. पण अर्जुन तेंडुलकरला त्याच्याबाबत आधीच माहिती होतं. युट्यूबर शुभंकर मिश्राच्या मुलाखतीत अर्जुन तेंडुलकरने सांगितलं होतं की, ‘मुकुल चौधरी खूप चांगले षटकार मारतो. सराव सामन्यात त्याचे षटकार पाहून प्रभावित झालो. प्रत्येक ठिकाणी षटकार मारण्याची ताकद आहे. स्क्वेअर लेग, पॉइंटच्या वरून, बॉलरच्या डोक्यावरून, अपर कट… त्याच्या फलंदाजीने मी प्रभावित झालो आहे.’ दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सची सध्याची स्थिती पाहता अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग 11 मध्ये  स्थान मिळणं कठीण दिसत आहे. कारण संघात एकापेक्षा एक सरस फलंदाज आणि गोलंदाज आहेत.

मुकुल चौधरीला किती मानधन मिळतं?

आयपीएल स्पर्धेत मुकुल चौधरीने अपेक्षित कामगिरी करत संघाला विजयी केलं. त्याने स्क्वेअर लेग आणि फाइन लेगच्या दिशेने दोन षटकार मारले. तर कवर-पॉइंटच्या वरून एक षटकार मारला. त्यामुळे गोलंदाजही हैराण झाले. पण लखनौ सुपर जायंट्सला त्याच्या ताकदीचा अंदाज आधीच होता. त्यामुळे लिलावात त्याच्यासाठी चांगली बोली लावली. त्याने 2.60 कोटी खर्च केले आणि त्याला संघात घेतलं. आता या पर्वात सर्वांच लक्ष मुकुल चौधरीच्या खेळीकडे असणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.