आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 16 व्या सामन्यात 2 अजिंक्य आणि चॅम्पियन्स संघ आमनेसामने आहेत. गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात कडवी झुंज आहे. आरसीबीचा 19 व्या हंगामातील हा तिसरा तर राजस्थानचा रॉयल्सचा चौथा सामना आहे. दोन्ही संघांनी या मोसमात खेळेलेले सर्व सामने जिंकले आहेत. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्याला 1 तास 10 मिनिटांच्या विलंबाने सुरुवात झाली. सामन्यातील पहिला चेंडू पावसामुळे संध्याकाळी साडे सातऐवजी रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी टाकण्यात आला.
राजस्थानचा हा चौथा आणि बंगळुरुचा तिसरा सामना आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातून आरसीबी टीमममध्ये मॅचविनर आणि अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याची एन्ट्री झाली आहे. जोश हेझलवूड याला जेकब डफी याच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. आरसीबीने हा एकमेव बदल केला आहे. जोशने आरसीबीला गेल्या मोसमात (IPL 2025) आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख योगदान दिलं होतं. त्यामुळे आरसीबी फ्रँचायजीने जोशसाठी 10 कोटींपेक्षा जास्त रक्कम मोजून त्याला आपल्यासोबत कायम ठेवलं. आरसीबीने जोशला मिनी ऑक्शनआधी 12 कोटी 50 लाख रुपयांत रिटेन केलं होतं.
जोश अनेक महिन्यांपासून दुखापतीसह झगडत होता. त्यामुळे जोशच्या कमबॅकची आरसीबी चाहत्यांना प्रतिक्षा होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जोश फिट असल्याचं ना हरकत प्रमाणपत्र (Noc) दिलं. त्यानंतर जोशचा अखेर प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला.
जोश आरसीबीसाठी गेल्या मोसमात 12 सामन्यांत खेळला. जोशने आरसीबीसाठी या 12 सामन्यांत 20 पेक्षा अधिक विकेट्स मिळवल्या. जोश 22 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला होता. जोशने या दरम्यान एका सामन्यात 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
लाईव्ह स्कोअरकार्ड
दरम्यान जोश हेझलवूड याने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत एकूण 40 सामने खेळले आहेत. जोशने या 40 सामन्यांमधील 39 डावांत 20.98 च्या सरासरीने आणि 8.28 च्या इकॉनमीने एकूण 39 विकेट्स मिळवल्या आहेत. जोशची 25 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स ही आयपीएलमधील एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. जोशने एकूण 2 वेळा 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे जोश आता 19 व्या मोसमाची सुरुवात कशी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.