IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
Tv9 Marathi April 11, 2026 08:45 AM

राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 10 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 16 व्या सामन्यात तडाखेदार अर्धशतक झळकावलं आहे. वैभवने गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये अर्धशतक केलं. वैभवने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं. वैभवने आरसीबीच्या भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यासारख्या अनुभवी गोलंदाजांची धुलाई केली.  वैभवने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. वैभवच्या या अर्धशतकी खेळीनिमित्ताने आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणाऱ्या भारतीय फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

वैभवचं दुसरं अर्धशतक

वैभवचं हे 19 व्या मोसमातील दुसरं अर्धशतक ठरलं. वैभवने याआधी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध अर्धशतक लगावलं होतं. विशेष म्हणजे वैभवने चेन्नई विरुद्धही 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. वैभवने यासह खास कामगिरी केली. वैभव आयपीएल स्पर्धेत 2 वेळा 15 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक करणारा फलंदाज ठरला. वैभवने त्याच्या आयपीएल कारकीर्दीत एकूण 3 अर्धशतकं लगावली आहेत.

आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय
  • यशस्वी जैस्वाल, 13 बॉल, 2023
  • केएल राहुल, 14 बॉल, 2018
  • युसूफ पठाण, 15 बॉल, 2014
  • वैभव सूर्यवंशी, 15 बॉल, 2026
  • वैभव सूर्यवंशी, 15 बॉल, 2026*
  • सुरेश रैना, 16 बॉल, 2014
  • वैभवला आरसीबी विरुद्ध शतक करण्याची संधी होती. मात्र आरसीबीने वैभवला वेळीच आऊट केलं आणि शतकाजवळ जाण्यापासून रोखलं. वैभवने या सामन्यात एकूण 26 चेंडूत 78 धावा केल्या. वैभवने या खेळीत 7 षटकार आणि 8 चौकार लगावले. वैभवने यासह 19 व्या मोसमात द्विशतक पूर्ण केलं. वैभव 19 व्या मोसमात 200 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.

    यशस्वी जैस्वाल पहिल्या स्थानी

    भारताकडून आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम हा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याच्या नावावर आहे. यशस्वीने अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलंय. यशस्वीने 2023 साली ही कामगिरी करुन दाखवली होती. वैभवनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी केएल राहुल विराजमान आहे. केएलने 2018 साली अर्धशतकापर्यंत पोहचण्यासाठी 14 चेंडूंचा सामना केला होता. या यादीत वैभव सूर्यवंशी आणि युसूफ पठाण संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी आहेत. तर सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर आहे. रैनाने 2014 साली 16 बॉलमध्ये 50 रन्सचा टप्पा गाठला होता.

    © Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.