IPL 2026: धडाकेबाज पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आज कोण मारणार बाजी; कशी असेल प्लेइंग-११
esakal April 11, 2026 01:45 PM

मुल्लानपूर : मागील मोसमात उपविजेता ठरलेला पंजाब किंग्सचासंघ यंदाच्या आयपीएलमध्येही चमक दाखवताना दिसत आहे. पहिल्या दोन लढतींत विजय साकारल्यानंतर श्रेयस अय्यरच्या पंजाब संघाची कोलकता नाइट रायडर्सविरुद्धची लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाली.

यामुळे पंजाब संघाची निराशा झाली. आता त्यांचा संघ उद्या (ता. ११) ईशान किशनच्या सनरायझर्स हैदराबादशी लढताना दिसणार आहे. हैदराबादच्या संघाला सातत्यपूर्ण खेळ करण्याची गरज आहे. त्यांना आतापर्यंत तीनपैकी दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. फक्त एकाच लढतीत त्यांनी विजय मिळवला आहे.

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

पंजाब संघाने पहिल्या दोन लढतींत गुजरात व चेन्नई या दोन संघांविरुद्ध धावांचा पाठलाग करताना धडाकेबाज विजय साकारले आहेत. चेन्नईविरुद्धच्या लढतीत त्यांनी २१० धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवला.

पंजाब संघाचे सर्व फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग या सलामीवीरांनी मागील मोसमात छान कामगिरी केली होती. यंदाच्या मोसमात त्यांनी पुढे आपली ही कामगिरी कायम ठेवली आहे. कूपर कोनोली व श्रेयस अय्यर या फलंदाजांकडून मधल्या फळीत धमक दाखवली जात आहे.

IPL 2025 : श्रेयसचं नेतृत्व अन् अनकॅप्ट खेळाडूंचा भरणा; 11 वर्षांनी फायनलमध्ये धडक देणाऱ्या PKBS चा या हंगामातील प्रवास वाचाच....

याशिवाय पंजाबच्या संघामध्ये शशांक सिंग, नेहल वधेरा, मार्को यान्सेन व मार्कस स्टॉयनिस या खेळाडूंचाही समावेश आहे. पंजाब संघाचा गोलंदाजी विभागही शानदार कामगिरी करीत आहे. अर्शदीप सिंग, झेवियर बार्टलेट, मार्को यान्सेन, विजयकुमार वैशाख या गोलंदाजांमध्ये प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना बांधून ठेवण्याची क्षमता आहे.

संभावित प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कॅप्टन/विकेटकीपर), नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन, जयदेव उनाडकट, हर्षल पटेल

पंजाब किंग्स: प्रभसिमरन सिंग, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कॅप्टन), शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.