म्हाडाचा उद्या लोकशाही दिन
मुंबई, ता. ११ : सर्वसामान्यांच्या घरासंदर्भात असलेल्या तक्रारी तत्काळ मार्गी लावता याव्यात म्हणून म्हाडा प्राधिकरणाच्या वतीने वांद्रे येथील मुख्यालयात चाैथ्या मजल्यावर सोमवारी (ता. १३) दुपारी १२ वाजता लोकशाही दिन कार्यक्रम हाेणार आहे. या कार्यक्रमाला म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात तक्रारी त्वरित निकाली काढण्यात येणार आहेत. अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात १५ दिवस अगोदर दाेन प्रतींत पाठविणे आवश्यक असून हा नमुना अर्ज म्हाडाच्या https://mhada.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.