CSK vs DC Live : MS Dhoni हॉटेलमध्येच थांबला... चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात मात्र 'तो' स्टार परतला, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संघात बदल
esakal April 11, 2026 11:45 PM

Chennai Super Kings vs Delhi Capitals Marathi Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये एकही विजय न मिळालेल्या चेन्नई सुपर किंग्सला आज प्रतिष्ठेच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना करावा लागणार आहे. दिल्लीला मागील सामन्यात गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर पराभूत केले होते, त्यामुळे ते विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चेन्नईला ३ सामन्यात हार पत्करावी लागली आहे आणि त्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता पुढील सामने जिंकणे गरजेचे आहे. MS Dhoni केव्हा परतणार? हा चेन्नईच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न आजही अनुत्तरीत राहिला.

महेंद्रसिंग धोनीने दुखापतीमुळे पहिल्या दोन आठवड्यांसाठी स्पर्धेतून माघार घेतली होती. पण, तो मागील दोन दिवसांपासून CSK च्या सराव सत्रात जोरदार फटकेबाजी करताना दिसला आणि त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळेल, असा अंदाज व्यक्त केला गेला. त्यात डेवॉल्ड ब्रेव्हिस यांच्याही तंदुरुस्तीचा प्रश्न होताच आणि तो आजच्या सामन्यात परतला आहे. आजचा सामना पाहण्यासाठी साक्षी धोनी व झिवा धोनी स्टेडियमवर आल्या आहेत.

लुंगी एनगिडीने या आयपीएलमध्ये प्रभावी गोलंदाजी केलेली दिसतेय आणि त्याने डेथ ओव्हरमध्ये ५.५ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. त्यात त्याने तीन विकेट्सही घेतल्या आहेत. डेवॉल्ड ब्रेव्हिसने मागील आयपीएलमध्ये मधल्या षटकात १७१ च्या स्ट्राईक रेटने १८० धावा करताना १३ षटकार खेचले आहेत. तेच डेथ ओव्हरमध्ये त्याचा स्ट्राईक रेट २६२ असा राहिला आहे. दुसरीकडे KL Rahul ने चेन्नईविरुद्ध ४५ ची सरासरी व १४३ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. CSK विरुद्ध मागील सहा डावात त्याने ७७, १६ ,८२, २०, ४० व नाबाद ९८ अशा धावा केल्या आहेत.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी संघात दोन बदल करताना आकिब नबी आणि आशुतोष यांचे पुनरागमन झाले आहे, तर चेन्नईच्या ताफ्यात डेवॉल्ड ब्रेव्हिसचे पुनरागमन झाले आहे, तर गुरजपनीतही संघात परतला आहे. महेंद्रसिंग धोनी टीम हॉटेल रुममध्येच थांबला आहे आणि तो तिथूनच सामना पाहणार असल्याचे कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितले.

SRH VS PBKS RESULT: पंजाबचा सर्वात मोठा विजय; हैदराबादला पराभूत करून IPL 2026 Point Table मधील पकड केली मजबूत

चेन्नई सुपर किंग्स - संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, सर्फराज खान, डेवॉल्ड ब्रेव्हिस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, अंशुल कंबोज, खलिल अहमद, गुरजपनीत सिंग

दिल्ली कॅपिटल्स - लोकेश राहुल, पथूम निसंका, समीर रिझवी, अक्षर पटेल, त्रिस्तान स्तब्स, डेव्हिड मिलर, आकीब नबी, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.