Punjab Kings biggest win against Sunrisers Hyderabad history: पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील विजयी मालिका कायम राखली. सनरायझर्स हैदराबादवर त्यांनी दणदणती विजय मिळवून नवा इतिहास रचला. २२० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग पंजाबने केला आणि आयपीएल इतिहासातील हा त्यांचा हैदराबादविरुद्ध सर्वात मोठा विजय ठरला. प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांनी PBKS ला IPL 2026 Point Table मध्ये ७ गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम राखले.
अभिषेक वर्माची फटकेबाजीअभिषेक वर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या आक्रमक फलंदाजीनंतरही SRHने २०-२५ धावा कमीच केल्या. अभिषेक व हेड यांनी ८.१ षटकांत १२० धावा फलकावर चढवल्या होत्या आणि PBKS समोर २५० पार लक्ष्य ठेवण्यात ते यशस्वी होतील, असेच वाटले होते. पण, शशांक सिंगने एकाच षटकात दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. हेड ३८ धावांवर ( २३ चेंडू) माघारी परतला, तर अभिषेकने २८ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह ७४ धावांवर बाद झाला. त्यात इशान किशनचा ( २७) सीमारेषेवर मार्को यान्सेनने अफलातून झेल घेतला.
SRH vs PBKS : अभिषेक शर्माची वादळी खेळी, मार्को यान्सेनचा 'वन हँड' कॅच... पंजाबचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले, बरेच काही घडले पंजाबच्या गोलंदाजांचे पुनरागमनपंजाबच्या गोलंदाजांनी नंतर चांगले पुनरागमन केले. पहिल्या सहा षटकांत १७.५ च्या सरासरीने धावा कुटणाऱ्या SRH ची धावगती संथ झाली. ७ ते १५ षटकांत त्यांना ७.८८ आणि १६ ते २० षटकांत ८.६ च्या सरासरीने त्यांना धावा करता आल्या. अर्शदीप सिंगने आयपीएलमध्ये पाचवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा दिल्या. त्याने सॅम कुरनला ( ४ वेळा) मागे सोडले. हेनरिच क्लासनच्या ३९ धावांनी हैदराबादने ६ बाद २१९ धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादविरुद्ध २०१४ मध्ये पंजाब किंग्सने २०६ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता.
प्रियांश आर्य व प्रभसिमरन सिंग यांनी पंजाबला आक्रमक सुरुवात करून देताना पहिल्याच षटकात १८ धावा चोपल्या. आयपीएलच्या डावातील पहिल्याच षटकात पंजाबने केलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. यापूर्वी त्यांनी कोलकाता ( २०१४), दिल्ली ( २०२४) आणि चेन्नई ( २०२५) यांच्याविरुद्ध पहिल्या षटकात १७ धावा चोपल्या होत्या. प्रभसिमरन आज घरच्या मैदानावर खेळण्याचा पुरेपूर आनंद लुटताना दिसला आणि त्याने संघाला ४ षटकांत अर्धशतकी पल्ला गाठून दिला. सुरुवातीला संयमी वाटणाऱ्या प्रियांशनेही पाचव्या षटकात हात मोकळे केले.
पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात प्रियांशने ६,६,४,४ असे हर्षल पटेलचे स्वागत केले आणि १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. PBKS ने पहिल्या सहा षटकांत ९३ धावा फलकावर चढवल्या. सातव्या षटकात शिवांग कुमारला गोलंदाजीला आणले गेले आणि प्रियांशने डीप मिड विकेटवर षटकार खेचला. शिवांगने पुढील चेंडू त्याच टप्प्यात टाकून प्रियांशला तसाच फटका मारण्यास भाग पाडले. पण, यावेळी नितीश कुमार रेड्डीच्या हाती सोपा झेल विसावला. प्रियांश २० चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारासह ५७ धावांवर बाद झाला आणि ९९ धावांची भागीदारी तुटली.
श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळीआजच्या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून पहिल्या सहा षटकांत १९८ धावा चोपल्या, ज्या पुरुषांच्या ट्वेंटी-२०मधील सर्वोत्तम ठरल्या. यापूर्वी २०१८ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून १५८ धावा झाल्या होत्या. आयपीएलमध्ये असा पराक्रम RCB vs SRH सामन्यात २०२४ मध्ये १५५ धावांचा झाला होता. प्रभसिमरननेही २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि पुढच्याच चेंडूवर क्लासनच्या हाती झेल देऊन तो बाद झाला. प्रभसिमरनने २५ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह ५१ धावा केल्या.
Viral Video : विराट कोहलीची 'कॉपी' करायला गेला, बाबर आझम स्वतःच्याच जीवाशी खेळला... थोडक्यात वाचला, सर्व खेळाडू पळत आले...शिवांगने SRH ला आणखी एक यश मिळवून देताना कूपर कॉनोलीला ( ११) झेलबाद केले. शिवांगने ४-०-३३-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली. पंजाबला ४२ चेंडूंत ६६ धावा अजूनही करायच्या होत्या. श्रेयस अय्यर व नेहाल वढेरा यांच्यावर पंजाबची भीस्त होती. पहिल्या षटकात २१ धावा देणाऱ्या हर्षलचा दुसऱ्या षटकात श्रेयसने समाचार घेतला आणि १८ धावा चोपल्या. पंजाबला शेवटच्या पाच षटकात ४१ धावाच करायच्या होत्या. श्रेयस व नेहाल यांनी ३५ चेंडूंत ६९ धावांची भागीदारी केली. हर्ष दुबेने ही जोडी तोडली, नेहाल १४ धावांवर बाद झाला. पंजाबला २३ चेंडूंत २३ धावा हव्या होत्या.
पंजाबने १८.५ षटकांत सामना संपवला.. श्रेयसने ३३ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावांची नाबाद खेळी केली. पंजाबने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि १० वेळा त्यांनी दोनशेहून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवला.
Highest targets chased down by PBKS262 विरुद्ध KKR, कोलकाता, 2024
220 विरुद्ध SRH, मुल्लानपूर, 2026
210 विरुद्ध CSK, चेन्नई, 2026
206 विरुद्ध CSK, अबुधाबी, 2014
206 विरुद्ध SRH, हैदराबाद, 2014
206 विरुद्ध RCB, मुंबई DYP, 2022
SRH विरुद्धचे मागील सर्वोच्च: 206 (PBKS द्वारे, हैदराबाद, 2014)