Maharashtra Temperature News : दिवसेंदिवस राज्यात तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानाचा मोठ्या प्रमाणात त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. राज्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. अनेक ठिकाणी 40 ते 42 अंश तापमानाची नोंद झाली आहे. कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद झाली याबाबतची माहिती पाहुयात.
राज्यात उष्णतेचा पारा चांगलाचा वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे तापमानाची नोंद झाली आहे. तापमाना वाढल्यामुळं नागरिकांना त्रास होत आहे. वाढत्या तापमानामुळं रस्त्यांवर लोकांची गर्दी दिसत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
अकोला - 42
अमरावती - 41.02
वर्धा - 40.5
यवतमाळ - 40.2
नागपूर - 39.4
चंद्रपूर - 39.8
मुंबई (सांताक्रुज) - 34.6
रत्नागिरी - 30
सोलापूर - 41.4
अहिल्यानगर - 40.1
सांगली - 40.3
जळगाव - 41
परभणी - 39.4
नंदूरबार - 39.7
नाशिक - 38.8
पुणे - 39
मालेगाव - 41
संभाजीनगर - 39.4
राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाला पोषक असलेले वातावरण निवळले आहे. काही भागात आजही ढगाळ हवामान होते. त्याभागात उकाडा जाणवत आहे. तर राज्यातील अनेक भागात तापमानात वाढ दिसून येत आहे. आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचाही अंदाज देण्यात आला आहे. तर राज्याच्या इतर भागातील तापमानात काहीसे चढ उतार दिसून आले. राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवस राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहून उकाडाही जाणवण्याची शक्यता आहे. इतर भागात मात्र तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटकाही वाढण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. आज राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला येथे नोंदले गेले. अकोल्यात 40.1 अंश सेल्सिअस तापमान होते. तर देशातील सर्वाधिक तापमान आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे 41.04 अंश सेल्सिअस नोंदले गेले. कोकण विभागासाठीही यलो अलर्ट (Heatwave Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट हवामान राहणार असून तापमान 36 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या काळात नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.