AI+ Nova चा पॉवरफूल वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा स्वस्त फ्लिप फोन लाँच
Tv9 Marathi April 12, 2026 12:45 PM

AI+ Nova Flip 5G भारतीय बाजारपेठेत लाँच झाला आहे. या फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, AMOLED इनर डिस्प्ले, मीडियाटेक प्रोसेसर, 50-मेगापिक्सल कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट यांचा समावेश आहे. तर तुम्हालाही कमी किंमतीत फ्लिप फोन खरेदी करायचा असेल तर नोव्हाचा हा फ्लिप फोन उत्तम आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की हा फोन तुम्हाला कोणत्या किमतीत मिळेल आणि या फ्लिप फोनमध्ये कोणती खास वैशिष्ट्ये आहेत.

या 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 29 हजार 999 रूपये आहे. हा फोन तुम्हाला ग्लेशियर व्हाइट रंगात मिळेल. याची उपलब्धता मे महिन्यात सुरू होईल परंतु कंपनीने अद्याप नेमकी कोणत्या तारखेला भारतीय बाजारात उपलब्ध होईल याची तारीख जाहीर केलेली नाही. या किंमत श्रेणीमध्ये हा फोन मोटोरोला एज 70 फ्यूजन, ओप्पो के13 टर्बो 5G, इन्फिनिक्स जीटी 30 प्रो 5G+ आणि वनप्लस नॉर्ड सीई5 5G सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो.

AI+ Nova Flip 5G चे खास वैशिष्ट्ये

स्क्रीन: या हँडसेटमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.9-इंचाचा AMOLED इनर डिस्प्ले आहे. या फोनची कमाल ब्राइटनेस 1200 nits पर्यंत आहे. याव्यतिरिक्त, यात 3.1-इंचाचा AMOLED आउटर कव्हर डिस्प्ले देखील आहे.

चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे.

ओएस: हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित NxtQ ओएसवर चालतो.
कॅमेरा: या फोनमध्ये मागील बाजूस 10x डिजिटल झूम असलेला 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि पोर्ट्रेट शॉट्ससाठी 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी, 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 4325 mAh क्षमतेची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे, जी 33 वॉट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटी: या हँडसेटमध्ये NFC, ब्लूटूथ, 5G, GPS आणि एक USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे. सुरक्षेसाठी, फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.