गुवाहाटी: आयपीएल २०२६ मध्ये सलग चार विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी (RR) एक अडचण निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या शेजारी बसलेला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हादेखील फोनमध्ये डोकावताना दिसल्याने खळबळ उडाली आहे.(IPL 2026)
राजस्थान रॉयल्सच्या डावातील ११ व्या षटकादरम्यान कॅमेरा डगआऊटकडे वळला असता, टीम मॅनेजर रोमी भिंडर मोबाईल फोन चालवताना दिसले. त्यांच्या शेजारी वैभव सूर्यवंशी बसला होता, जो नुकताच २६ चेंडूत ७८ धावांची तुफानी खेळी करून परतला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी आणि तज्ज्ञांनी आयपीएलच्या (Anti-Corruption) नियमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
This is COMPLETELY A NO NO. WHERE WAS ANTI CORRUPTION 😳 https://t.co/6za4cvc6gm
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) April 11, 2026
आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले की, "हे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. अँटी-करप्शन युनिट नक्की कुठे होते?" असा सवाल करत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला स्टेडियममध्ये पोहोचल्यावर त्यांचे मोबाईल, स्मार्टवॉच आणि इतर गोष्टी 'सिक्युरिटी लायझन ऑफिसर'कडे (SLO) जमा करावी लागतात.
ड्रेसिंग रूम: मॅनेजरला केवळ ड्रेसिंग रूममध्ये फोन वापरण्याची परवानगी असते.
डगआऊट: डगआऊटमध्ये फोनचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.
अपवाद: केवळ अधिकृत 'अॅनालिस्ट'ला डेटा पाहण्यासाठी लॅपटॉप वापरण्याची मुभा असते.
राजस्थानची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी केली. पहिलं षटक दीपक चाहर टाकत होता. या षटकात जैस्वालने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत तब्बल 22 धावा चोपल्या. त्यात 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. दुसरं षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह आला. त्याच्या पहिल्याच चेंडूवर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 88 मीटर लांब षटकार ठोकत सर्वांना थक्क केलं. एवढंच नाही, तर त्याच षटकात आणखी एक षटकार मारत त्याने बुमराहवर दबाव आणला. या षटकातून एकूण 14 धावा आल्या.
पाचवं षटक शार्दुल ठाकूर टाकायला आला. या षटकात वैभवने 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला, पण अखेरच्या चेंडूवर ठाकूरने त्याला बाद केलं. वैभव सूर्यवंशीने फक्त 14 चेंडूत 39 धावांची तुफानी खेळी केली. जवळपास 279 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत त्याने 1 चौकार आणि 5 षटकार ठोकले. यानंतर ध्रुव जुरेल 3 धावा करून एएम गझनफर चा बळी ठरला. त्यानंतर कर्णधार रियान पराग यालाही गझनफरने बाद केलं. परागने 10 चेंडूत 20 धावा केल्या. मात्र दुसऱ्या टोकाला यशस्वी जैसवाल खंबीरपणे उभा राहिला. त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी करत संघाचा डाव 150 धावांपर्यंत नेला. जैस्वालने फक्त 32 चेंडूत नाबाद 77 धावांची खेळी खेळली.
151 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरुवातच धक्क्याने झाली. सलामीवीर रायन रिकलटन 8 धावा करून जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर ध्रुव जुरेलकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर अनुभवी रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र संदीप शर्माने त्याला अवघ्या 5 धावांवर पायचीत (lbw) करून माघारी धाडले. फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादव देखील आज अपयशी ठरला. त्याला नांद्रे बर्गरने 6 धावांवर असताना जोफ्रा आर्चरच्या हाती झेलबाद केले. तर कर्णधार हार्दिक पंड्याने 9 चेंडूत 15 धावा केल्या, पण तोदेखील मोक्याच्या वेळी बाद झाला. रवी बिश्नोई आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी 2 बळी घेत मुंबईच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. मुंबई इंडियन्सला 11 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 123 धावा करता राजस्थान रॉयल्सने 27 धावांनी शानदार विजय मिळवला.