लंडनच्या प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट डॉ. झेना विल्समोर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंबंधी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. डॉ. झेनाच्या मते, या काळात लोक जास्त प्रमाणात दारू पीतात, ज्यामुळे त्यांच्या स्किनवर खूप जास्त नकारात्मक परिणाम होतो. हे केवळ वजन वाढण्याचे कारण बनत नाही, तर स्किनला मोठ्या प्रमाणात नुकसानही पोहोचवू शकते. एक अतिरिक्त ग्लास दारूही खूप मोठी समस्या निर्माण करू शकतो.
जास्त प्रमाणावर दारु प्यायल्याने स्किन कॅन्सरचा धोका वाढतो, लवकर म्हातारे दिसणे, इतर स्किन समस्या – चेहऱ्यावर आणि शरीरावर ब्लोटिंग (सूज), लालसरपणा आणि इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. स्किन ट्रीटमेंटचा प्रभाव कमी होणे – तुम्ही कोणतेही स्किन ट्रीटमेंट घेत असाल तर जास्त दारूमुळे ते योग्य प्रकारे काम करत नाही. शक्य तितके दारू आणि सिगरेट यांचे सेवन कमी करणे गरजेचे आहे.
दारू शरीरात गेल्यानंतर एक प्रकारची केमिकल रिअॅक्शन सुरू होते, जी थेट आपल्या DNA वर परिणाम करते. यामुळे शरीरातील नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रिया (repair process) मंदावते. हे शरीरातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट सिस्टमवरही परिणाम करते, ज्यामुळे फ्री रॅडिकल्समुळे स्किनचे नुकसान होते आणि एजिंग प्रक्रिया लवकर दिसू लागते. याशिवाय इम्यून सिस्टमवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. जर दारूसोबत सिगरेट प्यायली तर हा परिणाम आणखी जास्त होतो. दारूमुळे शरीरातील नैसर्गिक व्हिटामिन-A चे प्रमाण कमी होते, ज्यामुळे सेल ग्रोथ आणि त्यांचे कार्य बिघडते.
डिहायड्रेशनमुळे स्किन कोरडी पडते आणि सुरकुत्या लवकर येतात, खराब झोपेमुळे स्किनमध्ये समस्या वाढतात, जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास सनबर्नची समस्या होऊ शकते, दारूसोबत खराब प्रकारचे जंक फूड खाल्ल्याने स्किनवर नकारात्मक परिणाम होतो, शरीर दारू नीट पचवू शकत नाही, त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो, जास्त दारू पिण्यामुळे लिव्हरच्या समस्या निर्माण होतात, ज्याचा परिणाम थेट स्किनवर दिसून येतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच दारु पिणाऱ्यांना प्रोत्साहन देत नाही)