Summer vacation : मुलांची उन्हाळी सुट्टी अशी बनवा क्रिएटिव्ह
Marathi April 12, 2026 02:25 PM

मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या लवकरच सुरू होतील. सुट्ट्यांमध्ये मुलांना अभ्यासाचे टेन्शन नसते. सुट्ट्या म्हणजे मुलांसाठी केवळ खेळ व मज्जामस्ती करण्याचे दिवस असतात. अनेक घरात मुलांची सुट्टी पालकांसाठी डोकेदुखी ठरते. अशावेळी मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी काय करावे याबद्दल पालक खूप गोंधळलेले असतात. जेव्हा आईवडील कामात व्यस्त असतात तेव्हा ते त्यांच्या मुलांना मोबाईल फोन देतात किंवा टीव्हीमध्ये गुंतवून ठेवतात. सध्याच्या डिजिटल काळात या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत परंतु जर मुले दिवसभर या गोष्टींमध्ये व्यस्त राहिली त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे वाईट ठरू शकते. त्यामुळे आज आपण मुलांची उन्हाळी सुट्टी कशी क्रिएटिव्ह बनवता येईल हे जाणून घेऊयात.

स्वयंपाकघरातील कामे

स्वयंपाकात मुलांची मदत घ्यावी. त्यांना भाज्या निवडणे, भाज्या स्वच्छ करणे, सलाड, सँडविच बनवणे अशी साधी सोपी कामे करायला शिकवू शकता. स्वयंपाकासोबतच स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगा. ही सर्वा कामे झाल्यावर त्यांना निघालेला कचराही गोळा करण्यास सांगावे. यामुळे ते स्वच्छतेसह ही कामेही शिकतील.

दिनक्रम बनवा

सुट्टीमध्ये शाळांचे टेन्शन नसते. त्यामुळे मुले त्यामुळे मुले आरामात झोपतात आणि उठतात, त्यांना हवे तेव्हा जेवतात आणि अभ्यासही टाळतात. पण जर तुम्हाला तुमच्या मुलाने सुट्ट्यांचा योग्य वापर करावा असे वाटत असेल तर त्यासाठी एक दिनक्रम बनवा. दररोज त्यांच्यासाठी काही कामे निश्चित करून ठेवावीत. अर्थात सुट्टी आहे तर थोडी विश्रांती देऊ शकता, पण त्यांना काहीतरी नवीन शिकण्यासाठी सतत प्रोत्साहन नक्की द्या.

श्लोक चौरस

सुट्टीत त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर छंद वर्गांना पाठवू शकता. जर त्यांना संगीत, नृत्य, पोहणे, स्केटिंग किंवा कोणत्याही प्रकारच्या खेळात रस असेल तर त्यांना शिकण्यास पाठवा यामुळे सुट्ट्यांचा चांगला वापर होईल.

मैदानी खेळ

तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मुलांना मैदानावर नक्की घेऊन जा. तेथे खेळण्यास प्रोत्साहन द्या. यामुळे त्यांचा व्यायाम होईल आणि त्यांना फ्रेशही वाटेल.

हेही वाचा – Second Baby प्लानिंग? जाणून घ्या दोन मुलांमध्ये किती असावे अंतर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.