सागर आव्हाड, साम टीव्ही
पुणे: अंगात दैवीशक्तीचा संचार असून, कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आमिष दाखवत एका भोंदूने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भोंदूने बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून या महिलेला ५० लाख ५५ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Sanjay Raut On Ashish Shelar | खालच्या पातळीचे लोक खालच्या शब्दात टीका करतात- संजय राऊतऔदुंबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे या भोंदूचे नाव आहे. याबाबत एका ४२ वर्षीय पीडित महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये कौटुंबिक वाद असल्याने ते वेगळे राहत आहेत. पाच वर्षांपूर्वी एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत या महिलेची गडदे याच्याशी भेट झाली. त्यावेळी गडदे याने आपण देवऋषी असल्याचे महिलेला भासविले. ‘माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार असून, मी तुमचे कौटुंबिक मतभेद दूर करतो,’ असा विश्वास संपादन करून त्याने महिलेला आपल्या जाळ्यात ओढले.
#Shorts : Mumbai Water Shortage News | मुंबईवर मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट?त्यानंतर त्याने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतरही त्याने लोणेरे, उत्तेखोल आणि माणगाव परिसरातील लॉजवर बोलावून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले.
#Shorts : Maharashtra Water News : राज्यावर जलसंकटाचे सावटगुंतवणुकीच्या आमिषाने उकळले लाखो रुपये -
कौटुंबिक मतभेद सोडविण्यासह आरोपी गडदे याने महिलेला नोकरीस लावण्याचे आणि बांधकाम व्यवसायातील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचेही आमिष दाखवले. मे २०२१ पासून त्याने महिलेकडून रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरूपात वेळोवेळी ५० लाख ५५ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, अखेर महिलेने ११ एप्रिल रोजी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलिस करत आहेत.