Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं
esakal April 13, 2026 01:45 AM

Nagpur student end of life exam failure : बीसीए अभ्यासक्रमातील पहिल्या वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने सुसाईड नोट मध्ये ‘माफ कर, मम्मी, तुझा मुलगा काहीच करू शकत नाही’ असे लिहून पंख्याला चादरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.१२) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास नागपूर लाडीकर ले-आऊट परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

अर्श नरेश बांते (वय १८, रा. मंगलधाम सोसायटी, लाडीकर ले-आऊट) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. याच शैक्षणिक वर्षात त्याने बीसीए अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. त्यातील पहिल्या सेमिस्टरला तो अनुत्तीर्ण झाला. त्यामुळे तो तणावात होता. काल रात्री जेवण केल्यावर तो आपल्या खोलीत झोपायला गेला. त्यानंतर आज सकाळी उशीर झाल्यावरही अर्श खोलीच्या बाहेर न आल्याने त्याच्या आईने दार ठोठावून त्याला उठविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी त्याच्या वडिलांना माहिती दिली. दार तोडून आत गेले असता, अर्शने पंख्याला चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्याला खाली उतरवून उपचारासाठी मेडिकलला नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत हुडकेश्वर पोलिसांनासूचना मिळताच, त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तपासात त्यांना अर्शने मृत्यूपूर्वी आईच्या नावे एक पत्र लिहिल्याचे आढळून आले. त्यात त्याने ‘माफ कर, मम्मी, तुझा मुलगा काहीच करू शकत नाही, मी काहीत कामाचा नाही’ असे नमूद केले होते.

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

मित्राला केला होता फोन

अर्शला तणावात असल्याने त्याने शनिवारी रात्री मृत्यूपूर्वी दीड वाजता त्याच्या मित्राला फोन केला होता. त्यावेळी त्याने अनुत्तीर्ण झाल्याने तणावात असल्याची माहिती दिली होती. त्यानंतरच त्याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली असावी, अशी शंका पोलिसांनीव्यक्त केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.