MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI
esakal April 12, 2026 11:45 PM

MI vs RCB Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (१२ एप्रिल) दोन सामने खेळवण्यात येत आहेत. दुसरा सामना बहुप्रतिक्षित असून हा सामना पाचवेळचे विजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात होणार आहे.

सध्याचे भारतीय संघाचे दोन सर्वाधिक अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली या सामन्यात आमने-सामने असतील. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे.

IPL 2026: पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याचे मुंबईसमोर आव्हान; वानखेडेवर आज रॉयल चॅलेजर्स बंगळूरशी सामना, कशी असेल प्लेइंग-११

त्याआधी नाणेफेक झाली असून मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. मुंबई संघात दुखापतीतून सावरलेल्या मिचेल सँटेनरचे पुनरागमन झाले आहे. त्याला गझनफरच्या जागेवर संधी मिळाली आहे. याशिवाय मयंक मार्कंडेलाही संधी देण्यात आली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही मोठा बदल केला आहे. त्यांनी जॉस हेडलवूडच्या जागेवर जेकॉब डफीला संधी दिली आहे.

प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रायन रिकल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह

इम्पॅक्ट प्लेअर पर्याय - शेरफेन रदरफोर्ड, कॉर्बिन बॉश, अश्वनी कुमार, रघु शर्मा, राज बावा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेव्हिड, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, सुयश शर्मा

इम्पॅक्ट प्लेअरचे पर्याय - रसिक सलाम दार, व्यंकटेश अय्यर, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, मंगेश यादव

दरम्यान, या सामन्यातून दोन्ही संघ विजयी लयीत परतण्याचा प्रयत्न करतील. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांचा हा यंदाच्या हंगामातील चौथा सामना आहे. मुंबई इंडियन्सने पहिला सामना जिंकल्यानंतर दोन्ही सामने पराभूत झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिले दोन सामने जिंकल्यानंतर तिसरा सामना पराभूत झाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघ त्यांचे शेवटचे सामने राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभूत झाले आहेत.

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल आमने-सामने आकडेवारी

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात आत्तापर्यंत ३४ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील १५ सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आहेत, तर १९ सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. शेवटच्या ५ सामन्यांपैकी २ सामने मुंबई इंडियन्सने, तर ३ सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.