मंत्री फोन उचलत नाहीत, उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा, श्रीकांत शिंदेंसमोरच संतोष बांगर आक्रमक
अभिषेक एकबोटे, एबीपी माझा April 13, 2026 11:13 PM

Hingoli Santosh Bangar News :  काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ते उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत. फोन उचलत नाहीत. अशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केली आहे. संतोष बांगर यांनी ही मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर केली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते. संतोष बांगर यांनी मंत्र्यांना घरचा आहेर दिल्यानं त्यांच्या वक्तव्याची दोरदार चर्चा सुरु आहे. 

काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेलीय

मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे असल्याचे मत संतोष बांगर यांनी व्यक्त केले. शिवसेना शिंदेसेनेच्या तीन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा आज नांदेड शहरात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी युतीच्या मंत्र्यांना विशेष करुन शिंदे गटाच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे. काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, ते उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत. फोन उचलत नाहीत अशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली. 

धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनीही श्रीकांत शिंदेंसमोर व्यक्त केली नाराजी

धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून आज सोलापुरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर निवडणुकीत झालेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यात आला. आज सोलापुरात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच धाराशिव येथील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. बैठकीदरम्यान शिवसैनिकांनी निवडणुकीतील घडामोडींवर नाराजी व्यक्त करत संबंधित मुद्द्यांवर नाराजगी व्यक्त केली. नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना भाजपच्या दावणीला बांधण्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळेस श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत 'पदाधिकाऱ्यांना शिस्त शिस्त नाही, बोलायला दिलं तर तुम्ही एकमेकांबरोबर मारामारी करता का'? आक्रमक भूमिका मांडली. तुळजापूर, कळंब आणि धाराशिव तालुक्यातील पक्ष संघटनेच्या कामगिरी बाबत सैनिकांनी नाराजगी व्यक्त केली आहे. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.