हमजाशी पंगा घेऊ नका..; रणवीर सिंहचा सासरे प्रकाश पादुकोण यांच्यासोबतचा व्हिडीओ चर्चेत
admin April 15, 2026 12:25 PM
[ad_1]

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे अभिनेता रणवीर सिंह सध्या यशाच्या शिखरावर आहे. अशातच त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो सासरे आणि माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांच्यासोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. दोघांच्या जाहिरातीचा हा व्हिडीओ असून यामध्ये ‘धुरंधर’शी संबंधित एक विनोद असून तो युट्यूबर ध्रुव राठीला टोमणा असल्याचं म्हटलं जात आहे. जाहिरातीत रणवीर आणि प्रकाश पादुकोण यांना वेगवेगळ्या सेटअपमध्ये दाखवलं गेलंय. दोघं एका बँकेच्या कार्डबद्दल बोलत असतात. पण त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये एक अशी गोष्ट आहे, ज्यावरून तो ध्रुव राठीला मारलेला टोमणा असल्याचं म्हटलं जात आहे.

रुपे (RuPay) कार्डच्या या जाहिरातीत रणवीर त्याच्या सासऱ्यांना सांगतो की, या कार्डने प्रत्येक ठिकाणी पेमेंट केलं जाऊ शकतं. टॉय स्टोअर, जिम, थिएटर आणि इतर सर्व जागांवर हे शक्य आहे. त्यानंतर दुसऱ्या सीनमध्ये जिथे रणवीर आणि प्रकाश पादुकोण थिएटरमध्ये उभे असतात, तेव्हा त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये रणवीरच्याच चित्रपटाचा एक पोस्टर दिसतो. या पोस्टरवर लिहिलंय, ‘बवंडर: द टॉर्नेडो’. चाहत्यांनी लगेच ही गोष्ट हेरली आणि त्यावरून कमेंट्स करण्यास सुरुवात केली. हे पोस्टर जाणूनबुजून लावल्याचं मत काहींनी नोंदवलं आहे.

युट्यूबर ध्रुव राठीने त्याच्या एका व्हिडीओमध्ये रणवीरच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांवर टीका केली होती. ‘ऑपरेशन भवंदर’ असं म्हणत त्याने खिल्ली उडवली होती. इतकंच नव्हे तर आदित्य धर दिग्दर्शित हे दोन्ही चित्रपट सत्ताधारी पक्षांच्या प्रचारासाठी बनवल्याचीही टीका त्याने केली होती. रणवीरच्या जाहिरातीवर एका चाहत्याने लिहिलं, ‘हमजाशी कधी पंगा घेऊ नका.’ तर दुसऱ्याने म्हटलंय, ‘रणवीरने ध्रुव राठीलाच रोस्ट केलं.’

ध्रुव राठीने काय म्हटलं होतं?

युट्यूबर ध्रुव राठीने त्याच्या एका व्हिडीओमध्ये रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ला ‘नॉनसेन्स प्रोपगेंडा’ म्हटलं होतं. ‘धुरंधर 2’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याने आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत त्यातसुद्धा चित्रपटावर जोरदार टीका केली होती. हा चित्रपट मनोरंजनासाठी बनला नाही, असं त्याने म्हटलंय. ही भाजपची सर्वांत महागडी निवडणूक जाहिरत आहे, अशी टीका ध्रुवने केली होती.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.