धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉबी देओलला पश्चाताप, सावत्र बहिणींबद्दल असं काय बोलून गेला…
Tv9 Marathi April 15, 2026 03:45 PM

Bobby Deol Latest Interview : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना फार मोठा धक्का बसला होता. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्यासाठी शोकसभेचं आयोजन केलं होतं. पण तेव्हा अभिनेत्री आणि धर्मेंद्र दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी, लेक ईशा देओल, अहाना देओल उपस्थित नव्हत्या. देओल कुटुंबियांनी हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींना दूर ठेवलं अशा चर्चांनी देखील जोर धरला, पण वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात एक गोष्ट अशी घडली ज्यामुळे बॉबी सावत्र बहिणींच्या अधिक जवळ आला… अभिनेता म्हणाला, ‘दुःखाच्या प्रसंगात आपल्याला आपल्या कुटुंबियांची अधिक गरज भासते आणि त्यांचं महत्त्व देखील कळतं…’

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत बॉबी देओल याने त्याच्या मनातील भावना बोलून दाखवल्या, अभिनेता म्हणाला, ‘वडिलांसोबत अधिक वेळ व्यतीत केला नाही.. जेवढं त्यांच्यासोबत राहायवा हवं होतं… वडिलांसोबत बसून अधिक गप्पा मारता आल्या असत्या, त्यांना आणखी प्रश्न विचारता आले असते. या भावनेने त्याच्या हृदयात एक अशी पोकळी निर्माण केली आहे, जी कायम राहील. याचा अभिनेत्याला पश्चाताप देखील आहे.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉबी देओल याने ईशा आणि अहाना याच्यासोबत असलेल्या नात्याच्या बदलाबद्दल मोठं वक्तव्य केलं. त्याने स्पष्ट केलं, प्रत्येक व्यक्ती दुःखाला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते, ज्यामुळे कधीकधी गैरसमज निर्माण होतात. पण कालांतराने या जखमा भरून येतात आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतात. बॉबीच्या मते, दुःखानेच त्यांना एकमेकांच्या अधिक जवळ आणले.

वडिलांच्या निधनानंतर बदललं आयुष्य

वडिलांच्या निधनानंतर बॉबी देओळ याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आहे. अभिनेता आता त्याच्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ व्यतीत करतो. बॉबीच्या मते, बॉक्स ऑफिस, सिनेमा आणि यश सर्वकाही मागे राहून जातं पण कुटुंबासोबत व्यतीत केलेले क्षण अधिक खास असतात, खरं यश तेच आहे, जे तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत पाहता…. असं देखील अभिनेता म्हणाला.

धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल सांगायचं झालं, 24 नोव्हेंबर 2025 मध्ये वयाच्या 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी सहा दशकांच्या कारकिर्दीत 300 हून अधिक सिनमांमध्ये काम केले. आजही धर्मेंद्र कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.