लिंगपिसाट भोंदू खरातच्या संपर्कात कोणकोणते राजकारणी ? दमानियांनी A To Z लिस्टच काढली बाहेर, नावं ऐकून एकेकाला फुटेल घाम
Tv9 Marathi April 15, 2026 04:45 PM

लैंगिक अत्याचार व फसवणुकीचे आरोप असलेला भोंदू अशोक खरातला अटक करून जवळपास महीना होत आला असून अजूनही याप्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होतेच आहेत. एकीकडे एसआयटीकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे, तर दुसरीकडे त्याच्या शोषणाला, फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक पीडित, अनेक लोकं समोर येत आहेत. अशोक खरात दैवी शक्ती असल्याचं कारण दाखवून अनेकांना गंडवत होता.अनेक बडी लोकं, बड्या असामी त्याच्याशी संपर्कात होत्या, ज्यामध्ये अनेक राजकारण्यांचाही समावेश होता.

तब्बल 1825 लोक त्याच्या संपर्कात होते असा दावा काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी यांनी केला होता. तर आज त्यांनी याचसंदर्भात पत्रकार परिषद घेत मोठा भांडाफोड केला. खरात याला लकोणी कधी, किती, कॉल केले, ते किती वेळ खरात यांच्याशी बोलले , याची सविस्तर माहिती दमानिया यांनी मांडली. एवढंच नव्हे तर कॉलचे टॉप 10 नंबरही त्यांनी मांडले. तसेच कोणकोणते राजकारणी त्यांच्याशी संपर्कात होते, हेही दमानियांनी सांगितलं. अंजली दमानिया यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.

काय म्हणाल्या दमानिया ?

अशोक खरात मोठा कसा झाला?. त्याला मोठं करणारे राजकारणी, अधिकारी होते.काही लोकं खरातला खूप मदत करत होते. एक उपजिल्हाधिकारी मदत करायचे, ते मुंबईत कार्यरत आहेत. त्याच्या दिमतीला सर्व होते. त्यातील काही राजकारणी नुसतंच भविष्य विचारायला गेले असतील. कुणी सांगितलं म्हणून गेले असतील. काही राजकारणी संधी साधूपणा करायला काही साध्य करायला गेले असतील. मी राजकारण्याची यादी जाहीर करत आहेत. त्यांचा सहभाग आहे, त्यांचा त्या विकृत कृत्यात सहभाग आहे किंवा पाठिंबा आहे, असं माझं म्हणणं नाही, असं त्या म्हणाल्या.  खरातच्या काळ्या कृत्यात हे लोक नसतील, पण हे लोक खरातच्या संपर्कात होते, त्याला फोन करत होते असं म्हणत दमानिया यांनी मोठा आरोप केला.

A To Z लिस्टच काढली बाहेर

नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, उदय सांगळे सिन्नरहून उभे होते. पराभूत झाले. तेही खरातला भेटले. विधान परिषद आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर (दादा भूसेंचे पीए), दीपक केसरकर यांचा आधीचा नंबर सापडला नाही. ट्रू कॉलर्सवरून नंबर शोधल्यावर केसरकरांचा नंबर मिळाला. त्यावरून 19 फोन झाले होते.

राहुल कोतडे ओएसडी विखे पाटलांचं, प्रभाकर काळे, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, नवीन नाव म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे. हे नाव वाचून मला दुख झालं असं दमानियांनी नमूद केलं.   त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. अशा बाबांकडे भविष्य विचारायला कोण घेऊन गेले माहीत नाही, असं म्हणत दमानिया यांनी खरातच्या संपर्कातअसलेल्या राजकारण्यांची संपूर्ण लिस्टच बाहेर काढली.

तसेच चाकणकर कुटुंबातील रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, बहीण प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, संकेत सायकर यांचे कॉल्स या यादीत सापडल्याचंही त्यांनी सांगितलं.

सर्व राजकारणी आणि अधिकारी हे सतत खरातला मदत करत होते. पाठिशी घालत होते. आताही कल्पना खरात आणि हर्षवर्धन खरात यांना अटक झाली तर या मागचं सर्व षडयंत्र बाहेर येईल म्हणून त्यांना लपवलं जात आहे, असा मोठा आरोपही दमानिया यांनी केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.