भारताच्या रस्त्यांवर राज्य करणारी प्रीमियम हॅचबॅक मारुती सुझुकी बलेनो ( Maruti Suzuki Baleno ) लवकरच नव्या अवतारात येणार आहे. अलिकडेच या कारचे फेसलिफ्ट मॉडेलला टेस्टींग दरम्यान पाहिले गेले. यामुळे हे स्पष्ट झाले की कंपनी २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत या कारला मार्केटमध्ये उतरवण्याच्या तयारीत आहे. साल २०२२ नंतर यात पहिला मोठा अपडेट येत आहे. लिक झालेल्या फोटोवरुन कळते की नवीन बलेनो पहिल्या पेक्षा जास्त स्पोर्टी आणि प्रीमियम असणार आहे. चला पाहूयात काय नवीन वैशिष्ट्ये यात असणार आहेत.
काही अशा प्रकारचे डिझाईन असणार – या नव्या मॉडेलमध्ये नवीन ग्रिल, नवीन फ्रंट बंपर आणि नव्या डिझाईनची हेडलाईट्स देण्यात आली आहे. कारला एक मस्कुलर लुक देण्यासाठी यात क्लेमशेल शेपचा बोनेट आणि नव्या स्टाईलची अलॉय व्हील्सचा वापर करण्यात आला आहे. एवढेच नाही तर फ्रंट ग्रिलच्या इंसर्ट्स आधी पेक्षा जास्त बोल्ड आहेत. आणि सोबत यात नवीन एलईडी डे – टाईम रनिंग लाईट्स ( DRLs) पाहायला मिळू शकते.
केबिनच्या आत देखील मारुतीने लक्झरी आणि आरामदायीपणाची काळजी घेतली आहे. बातमी आहे की २०२६ बलेनोत एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळणार आहे. जी वायरलेस एप्पल कारप्ले एंड एंड्रॉईड ऑटोला सपोर्ट करेल. याशिवाय इंटेरिअरमध्ये नवीन मटेरियल आणि प्रिमीयम ट्रिम्सचा वापर केला जाईल. कारमध्ये आतापर्यंत एक ‘ऑल- डिजिटल’ इंस्ट्र्रूमेंट क्लस्टर देखील देण्यात येऊ शकतो. ज्यामुळे ड्रायव्हरला सर्व माहिती डिजिटल स्क्रीनवर मिळेल.
फिचर्समध्ये अनेक बदल केले आहेत. ३६० डिग्री कॅमेरा, वायरलेस स्मार्टफोन चार्जर आणि लेदरेट सीट्स सारखे शानदार फिचर्स देखील मिळू शकतात. तसेच सेफ्टी आणि ड्रायव्हिंगला सोपे बनवण्यासाठी ORVMs वर टर्न सिग्नल्स आणि नवीन इन-कार कनेक्टिव्हीटी बेस्ड फंक्शन देखील सामील केले जाऊ शकतात. हे अपडेट बलेनोला तिच्या सेगमेंटमध्ये सर्वात हायटेक हॅचबॅक कारच्या लिस्टमध्ये सर्वात वरती उभी करेल.
सर्वात मोठा बदल कारच्या इंजिनमध्ये होऊ शकतो. सध्या बलेनो मध्ये १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन मिळते. नव्या रिपोर्टनुसार मारुती यात लेटेस्ट स्विफ्ट आणि डिझायर वाले नवीन Z – सीरीज ३ – सिलिंडर इंजिन देऊ शकते. या शिवाय १.० लिटर बूस्टरजेट इंजिन देखील पर्याय म्हणून दिले जाऊ शकतात. तसेच सीएनजीचा पर्याय देखील पहिल्या सारखा असणार आहे. विक्रीमुळे बलेनो कंपनीसोबतच देशातही नंबर – १ प्रीमियम हॅचबॅक कार बनली आहे.