आपल्या शरीराच्या विशिष्ट अवयवांची रचना आपल्या स्वभावाबद्दल बरंच काही सांगून जाते. यामध्ये हातांची नखे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. नखांचा आकार, लांबी आणि पोत यावरून त्यात व्यक्तीचे गुण-दोष आणि प्रवृत्ती ओळखता येते. तुमच्या नखांचा आकारावरुन तुमचा स्वभाव कसा आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
ज्यांची नखे लांब आणि आयताकृती असतात, अशा व्यक्ती खूप शांत, संयमी आणि कल्पक असतात. हे लोक सहसा विचारपूर्वक निर्णय घेतात. त्यांना नवीन गोष्टी शिकायला आवडते. ते कोणाशीही वाद घालणे टाळतात.
ज्यांच्या नखांचा आकार रुंद असतो, ते लोक अत्यंत स्पष्टवक्ते आणि प्रामाणिक असतात. त्यांना आपले विचार समोरच्या व्यक्तीसमोर मांडायला अजिबात भीती वाटत नाही. असे लोक उत्तम नेतृत्व करू शकतात. तसेच कठीण प्रसंगात शांत राहून निर्णय घेतात.
गोल किंवा लंबवर्तुळाकार नखे असलेल्या व्यक्ती खूप आनंदी आणि सकारात्मक असतात. त्यांना लोकांशी मिसळायला आणि नवीन मैत्री करायला खूप आवडते. हे लोक सहसा संघर्षापासून लांब राहणे पसंत करतात. ते कोणाचेही मन दुखावत नाहीत.
त्रिकोणी नखे असलेल्या व्यक्ती खूप बुद्धिमान असतात. त्यांना खूप बारीक गोष्टींचीही काळजी असते. असे लोक खूप क्रिएटिव्ह असतात. त्यांना कलाक्षेत्रात जास्त रस असतो. मात्र हे लोक कधीकधी थोडे चिडखोर असू शकतात.
ज्यांची नखे बदामाच्या आकाराची असतात, ते लोक खूप दयाळू आणि नम्र स्वभावाचे असतात. त्यांना इतरांना मदत करायला आवडते. हे लोक खूप विश्वासू असतात, त्यामुळे लोक त्यांच्यावर लवकर विश्वास ठेवतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)