पूजेचे साहित्य बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा या पूजेची भीती वाटेल आणि हा एक प्रकारे ब्लॅक मॅजिकचाच म्हणजेच जादूटोण्याचा प्रकार आहे हे तुमच्या लक्षात येईल. मात्र अशाप्रकारे राजरोसपणे सुरू असताना पोलिसांचे याकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित केला जातोय. या सगळ्यावर या रिदम पांचाळशी आम्ही त्याच्याशी संपर्क साधून त्याचं म्हणणं जाणून घेतलं तर त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले. अशाप्रकारे कुठलाही जादूटोणा मी करत नाही, तर मी एक प्रकारे पूजा करत लोकांची सेवा करतो आणि त्यातून एक रुपयाही कमवत नाही असं तो म्हणतो.. उलट त्यांचा त्रास मी दूर करतो असा दावा त्यांनी केला आहे.
मुंबई जी कधीही झोपत नाही म्हणतात. जी कधीही शांत नसते. जिथे नेहमी वर्दळ असते. अशा दाट वस्ती असलेल्या मुंबईमध्ये अशाप्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी गोष्ट घडते. ही फक्त आताच घडतीये असं नाही तर मागील अनेक दिवसांपासून घडते. त्याला अनेक सुशिक्षित लोक बळी पडताय आणि याला खत पाणी देतात हे एक प्रकारे दुर्दैव आहे. त्यामुळे अशा वृत्तीला त्या ठिकाणीच थांबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्यासारख्यांनी डोळे उघडे ठेवून हे प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणे सुद्धा तितकेच महत्वाचं आहे. यावर आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात? हे पहावं लागेल.