जागतिक भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक देश आपली संरक्षण सज्जता सक्षम करण्याकडे भर देत आहे. म्हणूनच अशा वातावरणात डिफेन्स शेअर्सदेखील गुंतवणुकदारांची रडारवर आहेत. त्यात एमटीएआर टेक्नोलॉजीज ( MTAR Technologies ) या शेअरने तर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बुधवारी या कंपनीच्या शेअरने १० टक्क्यांची उसळी घेत ४८६० रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. आता हा शेअर ५००० रुपयांच्या दिशेने कूच करत असून गुंतवणूकदारांमध्ये संभाव्य तेजीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
तेजीचे मुख्य कारण: एक मोठी जागतिक डीलया तुफानी तेजीमागे रॉयटर्सचा एक अहवाल आहे. वृत्तानुसार, 'ब्लूम एनर्जी' (Bloom Energy) या कंपनीने 'ओरेकल'सोबत २.८ गीगावॉट इंधन पेशींच्या (Fuel Cells) पुरवठ्यासाठी एक मोठा करार केला आहे. आता तुम्ही म्हणाल, याचा एमटीएआरशी काय संबंध? तर, एमटीएआर टेक्नोलॉजीज ही ब्लूम एनर्जीची प्रमुख 'स्ट्रॅटेजिक सप्लायर' आहे. कंपनीच्या एकूण महसुलात ब्लूम एनर्जीचा वाटा तब्बल ५५-६५ टक्के इतका मोठा आहे. ब्लूम एनर्जीच्या सॉलिड ऑक्साईड इलेक्ट्रोलायझर प्रोग्राममध्ये एमटीएआर महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे या जागतिक डीलचा थेट फायदा भारतीय कंपनीला मिळणार आहे.
परताव्याचा पाऊस: ७ महिन्यांत २४१% वाढएमटीएआरच्या शेअरची घोडदौड थक्क करणारी आहे. अवघ्या ७ महिन्यांपूर्वी, म्हणजे ९ सप्टेंबर २०२५ रोजी या शेअरची किंमत १४१२.६० रुपये होती, जी आज ४८६० रुपयांवर पोहोचली आहे.
- ५ दिवस: १५% वाढ
- १ महिना: ४०% वाढ
- ६ महिने: १२०% वाढ (पैसे दुप्पट)
- ७ महिने: २४१% वाढ (पैसे तिप्पट)
१५१९८ कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या एयरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रातील आणि आंतरराष्ट्रीय कंत्राटे यामुळे हा शेअर सध्या 'रॉकेट' बनला आहे.
कंपनीची मागील तिमाही कामगिरी(आकडे कोटींमध्ये)
ट्रेडलाईनच्या विश्लेषणानुसार, शेअरसाठी ४ तज्ज्ञांनी
स्ट्रॉंग बायचा सल्ला दिला आहे. म्हणजेच येत्या काळात शेअर्समध्ये चांगल्या तेजीची शक्यता आहे. असे असले तरी बाजारातील गुंतवणूक जोखीमीची असल्याने गुंतवणुकदारांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.