Latur District Hospital: लातूरच्या जिल्हा रुग्णालय उभारणीच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. या संदर्भातील कार्यारंभ आदेश काढण्यात आला असून या कामाचे खरे श्रेय कोणाचे? यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. काँग्रसेचे आमदार अमित देशमुख, भाजपाचे संभाजी पाटील निलंगेकर या आमदारांनी हे जिल्हा रुग्णालय आपल्या प्रयत्नामुळेच आल्याचा दावा केला आहे. लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असली तरी या रुग्णालयामुळे सर्वसामान्यांना मात्र फायदा होणार आहे.
IAS Transfers: महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडका! नव्यानं 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे, मुंबई, सोलापूर, गडचिरोली, धाराशिव जिल्ह्यात नियुक्त्याआमदार अमित देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात लातूर जिल्हा रुग्णालयासाठी आपण कसे आणि किती प्रयत्न केले? या संदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या लातूर येथील जिल्हा रुग्णालय उभारणीचा कार्यारंभ आदेश आखेर निघाला आहे. ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. याबद्दल महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य मंत्री, आणि पालकमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात प्रस्तावित केलेल्या आणि मंजूर झालेल्या या लातूर जिल्हा रुग्णालय उभारण्याचे काम मध्यंतरीच्या काळात अनेक कारणामुळे प्रलंबित राहिले होते. माझे लातूर परिवार व अनेकांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. काही काळ या रुग्णालयासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने हे काम थांबले होते. जागा उपलब्ध करून दिल्यानंतर त्या जागेचा मोबदला न मिळाल्यामुळे काही काळ हे काम प्रलंबित राहिले, जागा मिळाली, जागेचे पैसे वर्ग केले, त्यानंतरही हे काम स्थितीमध्ये अडकले होते.
माझ्यासह अनेकांनी अनेक पातळ्यावर पाठपुरावा केल्यानंतर अखेर या प्रकल्पाचा कार्यारंभ होत आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन सर्वसामान्य जनतेला उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील हा विश्वास आहे. वास्तविक पाहता लातूर जिल्हा रुग्णालय प्रस्तावित केले तेव्हा जिल्ह्याची 2001ची लोकसंख्या गृहीत धरून 100 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. 17 जानेवारी 2013 रोजी या रुग्णालयाला मंजुरी मिळाली. 2019 मध्ये आघाडीचे सरकार असताना वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या लातूर येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या परिसरातील 10 एकर जागा या जिल्हा रुग्णालयासाठी निश्चित करण्यात आली. या जागेसाठी विद्यापीठाकडून आणि कृषी विभागाकडून मोबदल्याची मागणी झाली तेव्हा शासनाच्या एका खात्याकडून दुसऱ्या खात्याकडे जागा हस्तांतरित होत असताना मोबदला कसा द्यायचा? यात हा प्रकल्प पुन्हा काही वर्ष रखडला होता, याची आठवणही अमित देशमुख यांनी करून दिली.
Nashik Kumbh Mela RTI: कुंभमेळा प्राधिकरण कायद्याचा भंग! DPR शिवाय बेकायदा कामं सुरु; खर्च पोहोचला १५,००० कोटींवरुन ३५,००० कोटींवरआता 2026 मध्ये लातूर शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या अनेक पटीने वाढली आहे त्यामुळे आज या रुग्णालय उभारणीस सुरुवात होत असेल तर सध्याची लोकसंख्या गृहीत धरून हे जिल्हा रुग्णालय 100 ऐवजी किमान 400 खाटांच्या क्षमतेचे उभारण्यात यावे अशी शासनाकडे मागणी नोंदवली आहे. आता या रुग्णालयाची उभारणी सुरू होत आहे, ती चालू करावी परंतु टप्प्याटप्प्याने या रुग्णालयाचा विस्तार करता यावा, असे डिझाईन आणि नकाशे तयार करण्यात यावेत.
ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय उभारताना, काही नवीन निकष सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केलेले आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने काढलेल्या परिपत्रकातील अटी आणि शर्तींची पूर्तता व्हावी, त्या दृष्टिकोनातून आणि पुन्हा वेळोवेळी जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करता यावा याचा विचार करून सदरील नकाशे तयार केले जावेत. यासाठी रुग्णालय उभारणीचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या वास्तुशास्त्रज्ञाच्या देखरेखीखाली या जिल्हा रुग्णालयाची उभारणी व्हावी, अशी मागणीही शासनाकडे वेळोवेळी केली आहे. त्याप्रमाणे सर्व सोयनीयुक्त सुसज्ज रुग्णालय उभे राहील, अशी अपेक्षा अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
Pune News : पालखीचा भवानी पेठेतील मुक्काम हलवणार? मुख्यमंत्र्यांकडं साकडं! साडेतीनशे वर्षांची परंपरा टिकवण्याचे आवाहन लातूरकरांचे स्वप्न होणार पूर्णदुसरीकडे आमदार संभाजी पाटील यांनी या निर्णायाबद्दल राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे आभार मानले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला लातूरकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आज सुटला असून सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर लातूरसाठी शंभर खाटांच्या नव्या जिल्हा रुग्णालयासाठी 25.70 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मंजूर करून 'कार्यारंभ आदेश' जारी केल्यामुळे आता लातूरकरांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे निलंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी, यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार राज्य सरकारकडे वारंवारपणे या रुग्णालयासाठी मागणी केली होती. 2023 मध्ये आपण दिलेले पत्र तसेच तत्कालीन आरोग्यमंत्र्यांशी भेट घेऊन केलेल्या चर्चेनंतर यावर तोडगा निघाला होता.
सरकारने कृषी विद्यापीठाची 10 एकर जमीन या नव्या रुग्णालयाला देण्याचे आदेश जारी देखील केले होते. या जिल्हा रुग्णालयाचे कार्य सुरु करण्याचे आदेश आता देण्यात आले असून लवकरात लवकर रुग्णालयाच्या बांधकामाच्या कामाला येत्या महिनाभरात प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात लातूरकरांच्या सेवेत एकनवे रुग्णालय दाखल होणार आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. तसेच आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून ही वास्तू साकारणार असल्याची भावना मनाला प्रचंड समाधान देत आहे, असे संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगत याचे श्रेय आपले असल्याचा दावा केला आहे.