आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 एप्रिल 2026
esakal April 16, 2026 10:45 AM

पंचांग -

गुरुवार : चैत्र कृष्ण १४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.१८ सूर्यास्त ६.५०, चंद्रोदय पहाटे ५.४८ चंद्रास्त सायंकाळी ५.५०, अमावास्या प्रारंभ रात्री ८.१२, भारतीय सौर चैत्र २६ शके १९४८.

दिनविशेष -

  • २००४ - सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानात प्रथमच कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला.

  • २००४ - जम्मू ते उधमपूर या लोहमार्गावर मालगाडीची यशस्वी चाचणी. काश्मीर खोऱ्याला देशातील इतर भागाशी रेल्वेने जोडणारा हा राष्ट्रीय प्रकल्प आहे.

  • २०१५ - स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-३’ क्षेपणास्त्राची व्हीलर बेटावर यशस्वी चाचणी.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.