राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिलदरम्यान, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १५ ते १७ एप्रिलदरम्यान काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
अकोल्यात बर्निंग बाईकचा थरारअकोल्यात 'बर्निंग बाईक'चा थरार पाहायला मिळालाये. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या 'बोचरा रुईखेड' रस्त्यावर दुचाकीने पेट घेतला आहे.. बघता बघता पूर्ण दुचाकी आगीच्या आटोक्यात आली होती.. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारासमोर अचानकपणे रानटी डुक्कर आडवं आलं, आणि त्याच दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, अन अपघात झाला.. 40 ते 50 फूट दुचाकी रस्त्यावर स्लिप होऊन घासत गेल्याने दुचाकीने पेट घेतला आहे.. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला आहे... अक्षरशः आगीत दुचाकी पूर्णतः जळाली आहे.. रात्री उशिरा ही घटना घडली
वसई विरारमध्ये गांजाची तस्करीमुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या वसई फाटा येथील एप्पल इन हॉटेल जवळ 15 किलोच्या गांजाची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या नार्कोटेक्स पथकाला आढळून आला आहे.
या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.