Jamakhed Crime: हॉटेलचालकासह पित्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जामखेड तालुक्यातील घटना, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती!
esakal April 17, 2026 02:45 PM

जामखेड: तालुक्यात वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका साडेतेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापाने व एका हॉटेलचालकाने शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही तीन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या बापासह हॉटेलचालकास पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

याप्रकरणी या दोघांवर पोक्सो, शारीरिक अत्याचार यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी ही जामखेड येथे आपल्या आजी, आजोबा व वडिलांसह रहात आहे.

दिवाळीच्या सुटीत ती वडिलांकडे आली. या भागातील एका हॉटेलवरील नळावर मुलगी आजीसह पाणी आणण्यासाठी जात असे. त्याचा गैरफायदा घेत हॉटेलचालक जयदत्त सदाशिव कात्रजकर याने तिच्यावर शेतात नेऊन तीन वेळा अत्याचार केला, तसेच धमकी दिली.

दरम्यान, पीडितेचा बाप दिवाळीनंतर कुटुंबासह बीड जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याने देखील मुलीवर नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत अनेक वेळा अत्याचार केला. मुलगी एप्रिल २०२६ मध्ये संगमनेर येथील शाळेत गेली असता, तेथे शाळेने तिची आरोग्य तपासणी करण्यास सांगितले. तपासणीत ही मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले.

Pune Education News: उन्हाळी सुट्टीतच शिक्षकांना प्रशिक्षण बंधनकारक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा निर्णय; ४ मेपासून हाेणार सुरुवात!

संगमनेर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी मुलीस व बापास जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी मुलीस विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर हॉटेलचालक कात्रजकर व तिच्या बापाची नावे निष्पन्न झाली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह त्यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. त्यांना बुधवारी (ता.१५) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.